घरताज्या घडामोडी'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' चा मराठी ट्रेलर प्रदर्शित

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चा मराठी ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

१० जानेवारी २०२० ला एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी:द अनसंग वॉरीयर’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती सूभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय देवगण दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठीतही असावा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली होती. अखेर या चित्रपटाचा मराठी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

- Advertisement -

एकनिष्ठ आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तानाजींच्या शौर्याची गाथा अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दमदार डायलॉगसह चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला आहे. तानाजी मालुसरेंच्या बलिदानाची साक्ष देणारा हा ट्रेलर चाहत्यांची वाहवा जरी मिळवत असला तरी हिंदीतून चित्रपट मराठीत डब केल्याचा प्रयोग यशस्वी झाल्यासारखा वाटत नाही. तसेच काही हिंदी शब्दांचा देखील मराठी ट्रेलरमध्ये वापर करण्यात आल्याने मराठीत सादर करण्यात येणारा हा चित्रपट कुठेतरी ट्रेलर बघताना खटकतो. हिंदी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ प्रमाणेच मराठी भाषेत असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं तेवढंच उत्सुकतेचं असणार आहे.

तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारलेला चित्रपट

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित करण्याबाबत अभिनेता अजय देवगण आग्रही होता. त्यामुळे आता हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी सिंहासारखे लढणारे तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तान्हाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते. अजय-काजोल या दोघांशिवाय सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, शरद केळकर यांच्या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -