घरमनोरंजनमिस युनिव्हर्स स्पर्धेत आता विवाहित स्त्रियासुद्धा होणार सहभागी; नवीन निर्णयाची अंमलबजावणी

मिस युनिव्हर्स स्पर्धेत आता विवाहित स्त्रियासुद्धा होणार सहभागी; नवीन निर्णयाची अंमलबजावणी

Subscribe

या निर्णयामुळे आता इथून पुढे या स्पर्धेमध्ये केवळ अवाविवाहित स्त्रियाचं नाही तर विवाहित स्त्रिया देखील सहभागी होऊ शकतात.

1952 पासून सुरू झालेली मिल युनिव्हर्स ही स्पर्धा जगभरातील लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. यावर्षी भारताल्या हरनाज सिंधूने मिस युनिव्हर्स होण्याचा मान पटकावला. दरम्यान, आता या स्पर्धेबाबत काही नवीन निर्णय घेण्यात आला असून 2023 पासून मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये विवाहिक महिला तसेच आई असणाऱ्या महिला देखील सहभागी होऊ शकतात. या निर्णयामुळे आता इथून पुढे या स्पर्धेमध्ये केवळ अवाविवाहित स्त्रियाचं नाही तर विवाहित स्त्रिया देखील सहभागी होऊ शकतात.

आता, या ब्युटी पेजंटमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनाच्या स्वप्नाआड त्यांचे लग्न आणि मुलं ही कोणतीही कारणं येणार नाहीत. त्यामुळे विवाहित महिला आपलं मिस युनिव्हर्स होण्याचं स्वप्न आता नक्कीच पूर्ण करू शकतात. यापूर्वी मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या नियमांमध्ये असे सांगितले जायचे की, मिस युनिव्हर्सची विजेती अविवाहित असायला हवी, तसेच मिस युनिव्हर्स हे विजेते पद प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण वर्षभर गर्भवती होऊ नये. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 18 ते 28 वयोगटातील महिला सहभागी होत होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

- Advertisement -

दरम्यान, आता या सर्व नियमांबाबत नवीन निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन नियमांचे 2020 मध्ये मिस युनिव्हर्स झालेल्या मेक्सिको देशाची आंद्रिया मेझाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.


हेही वाचा :पंकजा मुंडे निवेदिकेच्या भूमिकेत; उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्याचे करणार निवेदन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -