घरताज्या घडामोडीनर डास धोकादायक आहेत की मादी डास?; छगन भुजबळांचा विधानसभेत मिश्कील सवाल

नर डास धोकादायक आहेत की मादी डास?; छगन भुजबळांचा विधानसभेत मिश्कील सवाल

Subscribe

सरकारने एकूण किती डास पकडले. डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत.

सरकारने एकूण किती डास पकडले. डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षरशः भंबेरी उडाली. (Chhagan bhujbal slams maharashtra government over mosquito awareness in Maharashtra Assembly Monsoon Session)

छगन भुजबळ यांनी आरोग्य खात्याच्या एका विषयावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर मिश्किल टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी अध्यक्ष महोदय. आतापर्यंत किती डास पकडले? हा माझा प्रश्न आहे. या सर्व डासांचं विच्छेदन केल्यावर त्यात किती नर आणि मादी डास आढळून आले. त्या विच्छेदनातून अतिशय संहारक डास कोणता आहे? मादी डास आहे की नर डास आहे? त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का?, असा मिश्किल सवाल छगन भुजबळ यांनी विधानसभेत करताच एकच खसखस पिकली.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात दिले.

मात्र या उत्तराने प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी डासांचे वर्गीकरण आणि विच्छेदन यावर प्रश्न केले मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना याचे योग्य उत्तर देता आले नाही. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘चालकाने लोकेशन नीट सांगितले नाही त्यामुळे…’; विनायक मेटेंच्या अपघाताबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -