घरमनोरंजनMoney Laundering : सुकेश चंद्रशेखर अन् जॅकलिनमध्ये प्रेमसंबंध? फोटो व्हायरल

Money Laundering : सुकेश चंद्रशेखर अन् जॅकलिनमध्ये प्रेमसंबंध? फोटो व्हायरल

Subscribe

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चांगलीच चर्चेत आहे. अशातच या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोंवरून जॅकलिन आणि ओरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. या फोटोमध्ये जॅकलिन सुकेशसोबत अगदी रोमँटिक अंदाज उभी असल्याचे पाहायला मिळतेय.

एका वृत्तानुसार, जॅकलिन आणि सुकेशचा हे फोटो एप्रिल-जूनमधील आहेत. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याचवेळी तिहार तुरुंगातून बाहेर आला होता. या फोटोंवरून जॅकलिन आणि सुकेशमध्ये चांगले संबंध असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान जॅकलिन सुकेशला डेट करत असल्याच्याही चर्चा सुरु आहेत, मात्र जॅकलिनने अनेकदा सुकेशसोबत आपले कोणतेही नाते नसल्याचे म्हटले आहे. तसेच २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर अडकण्याचा प्रयत्न करत असल्याचे जॅकलिनने म्हटले आहे. त्यामुळे जॅकलीनची ईडीकडून अद्याप चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सुकेशच्या हातात फोन असून जॅकलिन त्याचा गालावर किस करताना दिसतेय. सुकेशने त्या फोनमध्येच इस्त्राइलचे सीमकार्ड टाकून २०० कोटी रुपये वसूल केले होते. जामीनावर बाहेर येताच सुकेश याच फोनचा वापर करत होता. मात्र या फोनमधील जॅकलिनचे फोटो व्हायरल झाल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी केली. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरच्या वकिलांनी जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती असा खुलासा केला. पण जॅकलीनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले की, ‘ईडीने जॅकलिन फर्नांडिसला साक्षीदार म्हणून बोलावले होते, तिने जबाब नोंदवला असून यापुढेही ती ईडीच्या तपास कार्याला पूर्णपणे सहकार्य करेल.’

- Advertisement -

मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ‘तिहार तुरुगांतून २०० कोटी वसूल करणारा आरोपी सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करायचा. तो स्पूफिंगद्वारे तिहार तुरुंगातून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जातेय. यावेळी जॅकलिनला त्याने महागड्या वस्तू आणि काही गिफ्ट पाठवल्या होत्या. मात्र चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारा किंवा फोन करणारा व्यक्ती जेलमध्ये असल्याचे माहिती नव्हती असे सांगितले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -