घरताज्या घडामोडीSamantar Season 2: स्वप्नील जोशीच्या समांतरचा दुसरा सिझन लवकरच

Samantar Season 2: स्वप्नील जोशीच्या समांतरचा दुसरा सिझन लवकरच

Subscribe

एमएक्स प्लेअरची निर्मिती असलेली मराठमोळी वेबसिरीज समांतरने आपला प्रेक्षक वर्ग अतिशय कमी वेळात निर्माण केला होता. स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या समांतरच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यानंतर याचा दुसरा सिझन कधी येणार? याची चाहते वाट पाहत होते. आता या सिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे संकते स्वप्निल जोशीने दिले आहेत. आपल्या फेसबुकवर पेजवर याबाबत त्याने वाच्यता केलेली आहे.

Krishna to Samantar! And now Samantar Season 2…Coming soon!

Posted by Swapnil Joshi on Friday, July 17, 2020

- Advertisement -

लेखक सुहास शिरवाडकर यांच्या रचनेवर आधारीत असलेली ही वेब सीरिज चांगलीच गाजली होती. पहिल्या एपिसोडपासून कुमार महाजन (स्वप्नील जोशी) या पात्राचे आयुष्य तुमच्या आमच्या सारख्यांसारखे अडचणींनी व्यापलेले असते. त्यात एक भविष्य सांगणारा व्यक्ती असं काही भविष्य सांगतो ज्याने कुमार महाजनच्या आयुष्यालाच कलाटणी मिळते. मग कुमारचा सुरु होतो प्रवास भविष्य जाणून घेण्याचा. पहिल्या भागाच्या शेवटी नीतिश भारद्वाज यांनी साकारलेली सुदर्शन चक्रपाणी ही भूमिका देखील चांगलाच ट्विस्ट आणते.

अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतने या सिरीजमध्ये कुमार महाजनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिचाही अभिनय अनेकांच्या पसंतीस उतरला. पहिल्या सीझनच्या शेवटच्या भागात कुमार महाजनच्या आयुष्यात एका महिलेचा प्रवेश होणार, असे दाखविण्यात आले होते. त्यामुळे ही महिला कोण? याबाबतही चाहत्यांची उत्सुकता नक्कीच ताणली गेली आहे. याचे उत्तरही दुसऱ्या सीझनमध्येच कळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -