घरमनोरंजन'माझं लग्न पुन्हा धोक्यात...', राखीचा ढसाढसा रडणारा व्हिडीओ व्हायरल

‘माझं लग्न पुन्हा धोक्यात…’, राखीचा ढसाढसा रडणारा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाले. त्यामुळे राखी सध्या खूप दुःखात आहे. आता अशातच राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती तिच्या लग्नावर संकट असल्याचं म्हणत आहे. शिवाय राखी यात खूप रडताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी राखीने आदिलसोबत लग्न केलं होत जे आता तुटणार असल्याचं राखी म्हणत आहे.

राखी लग्न संकटात

 

View this post on Instagram

 

A post shared by MovieMate Media (@moviematemedia)

राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय ज्यात राखी मोठमोठ्याने रडताना म्हणते की, “माझे लग्न धोक्यात आहे हे लग्न मस्करी नाही. मला माझं लग्न वाचवायचे आहे.” शिवाय राखी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत अपूर्ण प्रेमाच्या पोस्ट शेअर करत आहे. ज्यातून खरंच राखीचे लग्न संकटात असल्याचे दिसून येतंय. राखीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं सांत्वन करत आहेत. याआधी देखील राखीने आदिलच्या घरचे त्यांच्या लग्नाविरोधात असल्याचं म्हणत आहेत.

- Advertisement -

राखी खासगी आयुष्यामुळे चर्चेत

राखी सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखी ‘बिग बॉस मराठी’तून बाहेर आली. त्यानंतर तिने आदिलसोबत केलेल्या लग्नाची बातमी जाहीर केली. बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस-15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

 


हेही वाचा :

निर्णय उत्तम आहे… विवेक अग्निहोत्रींनी केलं अर्थसंकल्पाचं कौतुक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -