घरमनोरंजननवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नीसह मुलांना देखील काढलं घराबाहेर; व्हिडीओ व्हायरल

नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नीसह मुलांना देखील काढलं घराबाहेर; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सोबत वाद सुरु आहेत. आलियाने पती नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप केला होता. अशातच नवाजुद्दीन सिद्दीकीने मध्यरात्री पत्नी आणि मुलांना घराबाहेर काढलं असल्याचं देखील समोर आलं आहे. त्याच्या पत्नीने स्वतः व्हिडीओ शेअर याबाबत खुलासा केला आहे.

आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया मुलांसोबत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बंगल्याबाहेर उभी असल्याचं दिसत असून त्याची दोन्ही मुलं रडताना दिसत आहेत. या व्हिडीओ आलियाने अनेक खुलासे केले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या व्हिडीओप्रकरणावर नवाजुद्दीनच्या भावाने खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

- Advertisement -

नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमासने सांगितलं की, “मध्यरात्री नवाजुद्दीनने मुलांना आणि पत्नीला घराबाहेर काढले. त्यामुळे ते बराच वेळ बंगल्याच्या गेटबाहेर उभे होते. त्यानंतर नवाजुद्दीनच्या मुलीने नवाजुद्दीनला फोन केला त्यावेळी नवाजुद्दीनने फक्त तिलाच बंगल्यात येण्याची परवाणगी दिली. आलिया आणि मुलगा यानीने घरात यायचे नाही असे सांगितले.”

VIDEO: बीमार मां को देखने पहुंचे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी को भाई ने गेट पर ही रोका

- Advertisement -

नवाजुद्दीनचे फक्त पत्नी आलियासोबतच नाही तर भावासोबत देखील वाद सुरु आहेत. नुकतच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता ज्यात नवाजुद्दीन त्याच्या आजारी आईला भेटायला भाऊ फैजुदीच्या घरी गेला होता मात्र त्याच्या भावाने त्याला बंगल्याच्या गेटपासूनच मागे पाठवले होते.


हेही वाचा :

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण, संशयीत आरोपी शीजान खानची जामीनावर सुटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -