घरमनोरंजन'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये नव्या तारक मेहताची एन्ट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नव्या तारक मेहताची एन्ट्री

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून चाहते तारक मेहताच्या भूमिकेची वाट पाहत होते. आता या मालिकेच्या निर्मात्यांनी चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून या मालिकेत तारक मेहता ही महत्वाची भूमिका साकारणार अभिनेता शैलेश लोढा ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा चालू होत्या आणि त्यांच्या जागी नव्या तारक मेहताची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत तारक मेहताची भूमिका शैलेश लोढाच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ दिसणार आहे. मालिकेच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

नव्या तारक मेहतासोबत होणार आजचा भाग
मागील अनेक दिवसांपासून चाहते तारक मेहताच्या भूमिकेची वाट पाहत होते. आता या मालिकेच्या निर्मात्यांनी चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. सचिन श्रॉफ सुद्धा तारक मेहता बनून खूप खूश आहे. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सचिन श्रॉफच्या एन्ट्री बाबत सांगितलं की, मी आपल्या गोकुलधाम कुटुंबीमध्ये सचिनचे मनापासून स्वागत करत आहे. ते तारक मेहताच्या व्यक्तित्वामध्ये जोष आणि भावनात्मकता घेऊन आले आहेत. मला खात्री आहे की, प्रेक्षक नव्या तारक मेहताच्या रूपातील सचिनच्या अभिनयाचा आनंद घ्याल. ते एक प्रतिभावान अभिनेते आहेत.

- Advertisement -

तसेच, जुन्या तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढांबाबत असित मोदी म्हणाले की, शैलेश लोढा यांच्याशी आमचा खूप मोठा आणि अद्भूत जोड आहे. ज्याला आम्ही नेहमी स्मरणात ठेऊ. मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देऊ इच्छितो.

दरम्यान, या मालिकेतून यापूर्वी दया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानीने देखील मालिका सोडली आहे. मात्र, दयाची भूमिकेसाठी निर्मात्यांना योग्य अभिनेत्री मिळालेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा :

‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून केला 225 कोटींचा टप्पा पार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -