घरमनोरंजन'सर्व लाईन व्यस्त आहेत'; चित्रपटाचा टीजर रिलीज

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’; चित्रपटाचा टीजर रिलीज

Subscribe

'सर्व लाईन व्यस्त आहेत...' या मराठी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला असून हा सिनेमा जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सर्व लाईन व्यस्त आहेत…’, हे वाक्य आपण दिवसातून अनेकदा ऐकतो. नेहमी एकाच बाईच्या तोंडून सतत हे वाक्य ऐकल्याने ते आपल्या चांगलंच अंगवळणी पडलं असलं, तरी याचं नावाचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं नाव जरी ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, असं असलं तरी यातील ‘लाईन’ जरा भलतीच दिसतेय आणि ती व्यस्त का आहे? हे सिनेमा पाहिल्यावरच समजणार असलं, तरी शीर्षकावरून आणि टीजर वरून हा सिनेमा धमाल कॉमेडी असणार हे सिद्ध होत आहे.

- Advertisement -

कलाकारांची तगडी फौज 

महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, नीथा शेट्टी आणि राणी अगरवाल असे कॉमेडीचे हुकुमी एक्के असलेली मंडळी नव्या वर्षाचा नवा धमाका घेऊन येत आहेत. स्टेलारीया स्टुडीयो निर्मित, अमोल उतेकर प्रस्तुत आणि प्रदीप मेस्त्री दिग्दर्शित सर्व लाईन व्यस्त आहेत हा धमाल चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -