घरमनोरंजनउनाड मुलांचा 'सूरसपाटा'

उनाड मुलांचा ‘सूरसपाटा’

Subscribe

'सूर सपाटा' 21 मार्चला होळीच्या निमीत्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार आहे. नुकताच मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

गावठी कबड्डीवर आधारित ‘सूर सपाटा’मधून एक ना दोन तब्ब्ल २५ हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकारांसह रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘सूर सपाटा’ 21 मार्चला होळीच्या निमीत्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार आहे. नुकताच मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा पार पडला. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शकुंतला खटावकर,माया अकरे मेहेर आणि शिव छत्रपती पुरस्कार शैला रायकर, ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे सूर सपाटा’ची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होता.

Sur Sapata team
सुर सपाटा टीम

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती या चित्रपटातील कलाकारांची. या गुलदस्त्यातील सर्व नावं समोर आली आहेत. अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे, नेहा शितोळे हे कलाकार सुरसपाटा मध्ये दिसणार आहेत.

- Advertisement -

एका मैदानी खेळाची कथा

जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा ‘सूर सपाटा’ प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे दाखवतो.

- Advertisement -

‘सूर सपाटा’ बालकलाकारांची वर्णी

‘सूर सपाटा’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबडे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -