घरमनोरंजनपठाण चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

पठाण चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘या’ दिवशी होणार ट्रेलर प्रदर्शित

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 10 जानेवारी 2023 रोजी पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरनंतर पठाणची चर्चा आणखी वाढणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर 1 मिनिटे 37 सेकंदाचा ट्रेलर असेल. तो अ‍ॅक्शन सीक्वेन्स, संगीत आणि हिरोपंतीने भरलेला आहे.

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट हिंदीव्यतिरिक्त, तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

तमन्ना भाटिया ‘या’ अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये? गोव्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -