घरमनोरंजन'परफ्युम' १ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

‘परफ्युम’ १ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

Subscribe

ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असून पोस्टरवरून ही सस्पेन्स-थ्रीलर प्रकारची प्रेमकहाणी असल्याचं दिसत आहे.

‘परफ्युम’ असं सुवासिक नाव असलेला नवा मराठी चित्रपट १ मार्चला तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून एक वेगळीच प्रेमकहाणी प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच ‘परफ्युम’ चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन पोस्टरचं लाँचिंग केलं. ‘हलाल’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लेथ जोशी’ या चित्रपटाची प्रस्तुती केलेल्या अमोल कागणे यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर, एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी ‘परफ्युम’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असून पोस्टरवरून ही सस्पेन्स-थ्रीलर प्रकारची प्रेमकहाणी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कथानकात काय काय वळणं असतील याची उत्सुकता या पोस्टरवरून निर्माण झाली आहे.

‘परफ्युम’ चित्रपटाच्या पोस्टर लाँचवेळी संपूर्ण टीम

पोस्टरवरील रंगसंगतीमुळे ही कथा अत्यंत रंगीबेरंगी आणि व्हायब्रंट असेल, असाही अंदाज आपल्याला लावता येतो. म्हणूनच हा “परफ्युम” नक्कीच दरवळेल आणि प्रेक्षकांना आकर्षित करून घेईल यात शंका नाही. दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. चित्रपटाची कथा किशोर गिऱ्हे यांची असून प्रोडक्शन हेड म्हणून स्वप्नील दीक्षितने काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे, शिल्पा ठाकरे, हिना पांचाळ असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

परफ्युम चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -