घरमनोरंजनपुनित राजकुमारची प्रतिज्ञेची अंमलबजावणी झाली, अन् चार जणांना दृष्टी मिळाली

पुनित राजकुमारची प्रतिज्ञेची अंमलबजावणी झाली, अन् चार जणांना दृष्टी मिळाली

Subscribe

कन्नड सिनेसृष्टीतील सुपस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. २९ ऑक्टोबरला पुनीत यांच्या अचानक जाण्याने अख्खा साऊथ सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होतेय. चाहत्यांनाही पुनीत यांच्या जाण्याचे दु:ख पचवणे कठीण जातेय. पुनीत यांनी जगाचा निरोप घेतला मात्र जाण्य़ापूर्वी त्यांनी चार अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश टाकाला आहे. पुनीत यांनी मरणानंतर आपले डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. १९९४ साली त्यांच्या वडिलांना घरातील सर्व लोकांचे डोळे त्यांच्या मरणानंतर दान केले जातील अशी शपथ घेतली होती. त्यानुसार पुनीत यांच्या निधनानंतरही नेत्रदान करण्यात आले.

त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत डॉक्टरांच्या पथकाने नेत्रदानाची शस्त्रक्रिया करत त्यांचे डोळे कलेक्ट केले. त्यानंतर लगेचच ते ट्रान्सप्लांट करण्यात आले आहेत. त्यांच्या या नेत्रदानामुळे चार दृष्टीहिनांना प्रकाशमय आयुष्य मिळलं आहे.

- Advertisement -

नारायण नेत्रालय या ठिकाणी पुनीतच्या डोळ्यांचं ट्रान्सप्लांट करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानानुसार, डॉक्टरांनी पुनीतचे दोन कॉर्निया ४ भागात विभाजन करुन ३ पुरुष आणि १ महिला अशा चार रुग्णांमध्ये कॉर्निया ट्रान्सप्लांट केला, या चारही रुग्णांचे वय २० ते २३ च्या घरात आहे. हे सर्व लोक गेली सहा महिल्यांपासून ट्रान्सप्लांटच्या प्रतिक्षेत होते. मात्र कोरोनामुळे नेत्रदान पूर्णपणे थांबले होते. मात्र पुनीत यांच्यामुळे चारही नेत्रहिनांना नवी दृष्टी मिळाली आहे.

शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर शेट्टी यांनी सांगितले की, नेहमी आम्ही दोन डोळे दान केल्यानंतर दोन लोकांना दृष्टी देऊ शकतो पण पुण्याच्या केसमध्ये चार तरुणांना याचा फायदा झाला आहे.

- Advertisement -

सुपरस्टार पुनित यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. पुनीत राजकुमार हे कन्नड सुपरस्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकडा मुलगा आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी २९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ‘चालिसुवा मोडागलू’(Chalisuva Modagalu) आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ (Yeradu Nakshatragalu) या चित्रपटांसाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अप्पू’ चित्रपटामुळे पुनीत राजकुमार यांना अधिक लोकप्रियता मिळाली. चाहत्यांकडून त्यानंतर पुनीत यांना ‘अप्पू’ नावाने ओळखले जाऊ लागले. आतापर्यंत त्यांनी कन्नडमधील अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. Yuvarathnaa हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -