Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला; हनी सिंगने शेअर केला फोटो

मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला; हनी सिंगने शेअर केला फोटो

Subscribe

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येने संपूर्ण पंजाबी सिने इंडस्ट्री हादरली. त्यांच्या अचानक जाण्याने संगीतक्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. सिद्धूच्या मृत्यूच्या जखमा अजून भरल्या नाहीत तोवर आणखी एका पंजाबी गायिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंगने हल्ला झालेला गायक अल्फाजचा फोटो शेअर करून ही दुःखद बातमी दिली आहे.

पंजाबी गायक अल्फाजवर हल्ला

हनी सिंगने अल्फासचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अल्फाज हॉस्पिटलच्या बेडवर असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याचा हातावर आणि शरीरावर जखमा दिसून येत आहे. यावरून अल्फाजची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे स्पष्ट झाले आहे. हनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काल रात्री माझा भाऊ अल्फाजवर कोणीतरी हल्ला केला. ज्याने या हल्ल्याचा कट आखला होता, त्याला मी सोडणार नाही. कृपया त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा.’

- Advertisement -

यानंतर पंजाबी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही अल्फाज लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. गायक अल्फाजवरील हल्ल्याच्या बातमीने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अल्फाजवर हल्ला करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्यांच्या शोध सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

- Advertisement -

अल्फाज एक प्रसिद्ध पंजाबी गायक आहे. याशिवाय तो अभिनेता, मॉडेल, लेखकही आहे त्यांचे खरे नाव अनजोत सिंग पन्नू आहे. अल्फाजचा जन्म चंदीगडमध्ये झाला. तिने 2011 मध्ये ‘ही मेरा दिल’ या पंजाबी गाण्याने संगीत विश्वात पदार्पण केले. याशिवाय त्याने बॉलिवूडमध्ये बर्थडे बॅश हे गाणे गायले आहे. अल्फाज 2013 मध्ये चित्रपटांमध्ये दिसला होता. जट एअरवेज हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

वयाच्या 14 व्या वर्षी अल्फाजने गाणी लिहायला सुरुवात केली. त्यांचे पहिले लिहिलेले गाणे त्यांने क्रशला प्रेरित होत लिहिले होते. 12 वीत शिकत असताना तो कॉल सेंटरमध्ये काम करू लागला. तसेच तो शाळा-कॉलेजमध्ये भागडा क्लासेस घेत होता. त्यावेळी त्यांचा पगार होता 25 हजार रुपये. अल्फाजला बालपणी लिरिकल मास्टर म्हणूनही ओळखले जात होते. असे म्हणतात की तो त्यांच्या जीवनातून प्रेरित होऊन गाणी लिहित होता.

सिद्धू मूसवाला बद्दल बोलायचे तर तो एक प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर होता. 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले होते. सिद्धू मूसेवालाप्रमाणेच अल्फाजवरही हल्ला झाला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -