घरमहाराष्ट्रहुंड्यासाठी अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

हुंड्यासाठी अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Subscribe

पत्नीचे अश्लिल फोटो सोशल मिडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत तिचा हुंडासाठी छळ करणार्‍या नराधम पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पत्नीचे अश्लिल फोटो सोशल मिडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत तिचा हुंडासाठी छळ करणार्‍या नराधम पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने माहेरहून फॉर्च्युनर गाडी घेऊन यावी यासाठी तो पत्नीचा छळ करत होता. याप्रकरणी त्या स्त्रीचे सासरे आणि नणंदांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचे नग्न फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी पतीने दिली होती. याप्रकरणी २४ वर्षीय पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

२४ वर्षीय विवाहित महिलेने पती विरोधात अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.विवाह झाल्यानंतर पती आणि पत्नी हे गोवा येथे फिरण्यासाठी गेले होतेय त्यावेळी चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले.त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढत पत्नीचा मोबाईल डेटा संमतीशिवाय काढून घेतला आणि नग्न फोटो हे मित्राला पाठवून सेव्ह करण्यास सांगितले. हे सर्व फोटो फेसबुक,नातेवाईक आणि इतर मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली.

- Advertisement -

तिचा पती हा हिंजवडी मधील नामांकीत कंपनीत संगणक अभियंता आहे,तर पत्नी ही उच्च शिक्षित असून गृहिणी आहे.या महिलेचा पती, फॉर्च्युनर गाडी मिळावी म्हणून तिचा छळ करत होता. त्या छळात तिचे सासरे, नणंदादेखील सहभागी होते, असे त्या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत या करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -