घरमनोरंजनमुन्नाभाई - ३ जून महिन्यात

मुन्नाभाई – ३ जून महिन्यात

Subscribe

मुन्ना भाई-३ चित्रपट पुढील वर्षी जून महिन्यात प्रकाशित होणार आहे. याचित्रपटाची स्टारकास्ट सारखीच असेल मात्र चित्रपटात नवीन अभिनेत्री झळकणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून मुन्नाभाई चित्रपटाची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. मुन्नाभाई चित्रपट हा प्रदर्शित झाल्यानंतर चांगलाच गाजला होता. प्रेक्षकांनीही त्याला खूप प्रतिसाद दिला होता. मुन्नाभाईच्या दोन्ही चित्रपटानंतर आता तिसऱ्या भागाची प्रेक्षक वाट बघत आहे. मात्र पुढच्यावर्षी जून महिन्यात चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याचा दावा ‘दैनिक भास्कर’ने केला आहे. याचित्रपटात अभिनेता संजय दत्त नवीन अभिनेत्रीबरोबर दिसणार आहे. राजकुमार हिरानी आणि अभिजीत जोशी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात मुन्नाभाई आणि सर्किटच्या भूमिकेत संजय दत्त आणि अरशद वारसी दिसणार आहे. याच बरोबर चित्रपटाच्या दोन्ही भागात झळकलेले बमन इरानीही दिसणार आहे.

- Advertisement -

नवीन अभिनेत्री

मुन्ना भाईच्या मागील दोन्ही भागात ग्रेसी सिंग आणि विद्या बालन या अभिनेत्रींनी काम केले. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाले की लवकरच शुटिंगला सुरुवात केली जाणार आहे. मुन्नाभाई ३ चित्रपटात सर्किटच्या भूमिकेत अरशद वारसी दिलणार नसल्याची चर्चा होती. सर्किटची भूमिका विकी कौशल करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अरशदने याला फक्त अफवा असल्याचे सांगितले.

“मी राजू हिरनी यांना नुकताच भेटलो आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. स्क्रिप्टवर काम पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी जून महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे त्यांनी संगितले. हा भाग ही इतर दोन भागा प्रमाणेच असेल. राजू हिरानी यांना चित्रपटाचा मुद्दा मिळत नव्हता मात्र आता मुद्दामिळाल्याने त्यांनी स्क्रिप्टींगवर काम सुरु केले आहे.”- अभिनेता अर्शद वारसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -