घरमनोरंजनVideo: फूटपाथवर गाताना दिसली 'रानू मंडल'ची डुप्लिकेट! बघून व्हाल थक्क

Video: फूटपाथवर गाताना दिसली ‘रानू मंडल’ची डुप्लिकेट! बघून व्हाल थक्क

Subscribe

या महिलेचा व्हिडिओ इनस्टाग्रामच्या एका फॅनक्लब पेजवरून शेअर केला असून एका यूजर्सने 'रानू मंडल पार्ट २' असे कॅप्शन दिले आहे.

पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात आपलं पोट भरणारी राणू तिच्या एका गाण्याच्या व्हिडिओने रातोरात स्टार झाली. तिच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, ती प्रसिद्धच झाली. हिमेश रेशमिया तिच्या आवाजाने प्रभावित होऊन रानूला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. मात्र या रानू मंडलनंतर सेम-टू-सेम दिसणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हाय़रल होत आहे.

डुप्लिकेट’ रानू मंडल’चा व्हायरल व्हिडिओ

- Advertisement -

रानू मंडल पुर्वी ‘ही’ होती स्टेशनवर गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर

या व्हिडिओमध्ये ती महिला रानू मंडलचे तेरी मेरी कहानी हे गाणं गाताना दिसतेय. रानू मंडल सारखी दिसणारी ही महिला गुवाहटीमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेचा व्हिडिओ इनस्टाग्रामच्या एका फॅनक्लब पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना एका यूजर्सने ‘रानू मंडल पार्ट २’ (Ranu Mondal 2.0) असे लिहिले आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेने राणू मंडलचे तेरी मेरी हे गाणं गायलं असलं तरी तिचे गाणं फार उत्तम नसलं तरी तिचा चेहरा हुबेहुब रानू मंडलशी मिळता जुळता आहे. हा तिचा व्हिडिओ तन्मय देब या नावाच्य़ा व्यक्तीने शूट केला आहे.

सध्या राणू मंडल नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरत असतात.  गेल्या आठवड्यात रानू मंडलचे मेकअप केलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्स आणि मीम्सचा चांगलाच वर्षाव झाला होता. यावेळी रानूला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.


रानू मंडलने गायलं तिसरं गाणं; अनोखा अंदाज बघून व्हाल थक्क!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -