‘रणवीर वर्सेस वाईल्ड विद बियर ग्रिल्स’मधून रणवीर सिंह करणार ओटीटीवर पदार्पण

रियालिटी शोच्या माध्यमातून रणवीर सिंह पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. रणवीर सिंहने शेअर केलेल्या या टीझर खाली त्याने "जंगल मे मंगल" असं कॅप्शही दिलेले आहे

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंहच्या नव्या ॲडव्हेंचर रियालिटी शो चे टीझर रिलीज करण्यात आले असून नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असणाऱ्या या शोचे नाव ‘रणवीर वर्सेज वाइल्ड विद बियर ग्रिल्स’ असे असून याचे टीझर रणवीर आपल्या सोशल मीडियावर शेअर करताच चाहते उत्सुक झाले आहेत. या रियालिटी शोच्या माध्यमातून रणवीर सिंह पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. रणवीर सिंहने शेअर केलेल्या या टीझर खाली त्याने “जंगल मे मंगल” असं कॅप्शही दिलेले आहे.

गमतीदार आहे टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 या टीझरच्या सुरुवातीला रणवीरच्या चेहऱ्यावर एक भीती दिसते. त्यानंतर अस्वल रणवीरचा पाठलाग करताना दिसत आहे. रणवीर संपूर्ण जंगलात जोरजोरात धावतो. त्यानंतर एका क्षणी तो मरण्याचे नाटक करतो, तेव्हा ते अस्वल त्याच्या जवळ येऊन त्याचे निरीक्षण करतो. शिवाय या व्हिडीओमध्ये जिपलाइनवर बेयर ग्रिल्स सुद्धा दिसून येत आहे. जो सांगत आहे की, रणवीरला मूर्ख ॲडव्हेंचरचा खिताब मिळणार आहे. असं म्हणत तो जिपलाइन वरून पुढे जातो. त्याला पुढे गेलेले पाहून रणवीर म्हणतो, “अरे भैया हा पागल तर निघून गेला,आता मी कसा जाणार”. त्यानंतर तो स्वतः जिपलाइमनच्या मदतीने जातो.

रणवीर सिंहचे ओटीटी पदार्पण
नेटफ्लिक्स स्पेशलमध्ये रणवीरचे ओटीटी पदार्पण होणार आहे. त्याने २०२१ मध्ये बेयर ग्रिल्ससोबत या शोच्या शूटिंगसाठी सर्बियाची यात्रा केली होती. तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी जयेशभाई जोरदार चित्रपटामध्ये दिसून आला होता. तसेच येत्या काळात तो आलिया सोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. याव्यतिरिक्त रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटामध्ये सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 


हेही वाचा :‘या’ पौराणिक मालिकेतून चिन्मय उदगीरकर करतोय निर्मिती क्षेत्रात पदार्पण