घरमनोरंजन'या' पौराणिक मालिकेतून चिन्मय उदगीरकर करतोय निर्मिती क्षेत्रात पदार्पण

‘या’ पौराणिक मालिकेतून चिन्मय उदगीरकर करतोय निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Subscribe

सध्या लोकप्रिय होत असलेल्या या मालिकेची निर्मिती अभिनेता चिन्मय उदगीरकर करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच चिन्मयने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे

मराठी मालिकाविश्वात आत्तापर्यंत जय मल्हार, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, दख्खनचा राजा ज्योतिबा, श्री लक्ष्मी नारायण, श्री स्वामी समर्थ यांसारख्या अनेक मालिकांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. अनेक नवनवीन पौराणिक कथांवर आधारित मालिका दाखवल्यास अशा पौराणिक मालिकांना प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. आत्तापर्यंत मालिकाविश्वात निर्माण झालेल्या अनेक मालिका आणि त्यातील लोकप्रिय झालेली पात्रं आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.आता अशीच एक ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही नवी पौराणिक मालिका मराठी कलर्स वाहिनीवर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

चिन्मय उदगीरकरच निर्मिता क्षेत्रात पदार्पण

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinmay Udgirkar (@chinmayudgirkar)

- Advertisement -

 सध्या लोकप्रिय होत असलेल्या या मालिकेची निर्मिती अभिनेता चिन्मय उदगीरकर करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच चिन्मयने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच चिन्मयची ही पहिलीच पौराणिक मालिका आहे. याआधी चिन्मय ‘घाडगे अॅण्ड सून’ , ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

मलिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
अवघ्या कमी काळात या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. सध्या या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकरणाऱ्या शंकर महाराजांचे लहान रूप दाखवले जात आहे. मात्र पुढील काळात शंकर महाराजांची मोठे रूप साकारणारा अभिनेता नक्की कोण असेल याची अनेकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेली आहे.सध्या मालिकेत शंकर महाराजांचे बाल रूप साकरणाऱ्या बाल कलाकराचे नाव आरूष बेडेकर असून पुढील काळात शंकर महाराजांचे मूळ मोठे रूप अभिनेता कोण साकारणार हे पुढील येत्या काळातच प्रेक्षकांना कळणार आहे. तसेच अभिनेत्री उमा पेंढारकर मालिकेत शंकर महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे.


हेही वाचा :“मी स्वतःशीच लग्न केलं कारण मला…..”क्षमा बिंदूने सांगितलं आत्मविवाह करण्यामागचे कारण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -