घरमनोरंजनकांतारासाठी ऋषभने केला होता 'या' गोष्टीचा त्याग

कांतारासाठी ऋषभने केला होता ‘या’ गोष्टीचा त्याग

Subscribe

कांतारा हा चित्रपट अवघ्या २० कोटींचा आहे. मात्र, चित्रपट रिलिज झाल्यापासून २५० कोटींहून अधिक कमाई झाली आहे. कांताराची कथा वेगळी असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कांतारा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. कन्नड भाषेतील हा चित्रपट गेल्या महिन्याभरापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम अशा भारतीय भाषांतही हा चित्रपट डब करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता ऋषभ शेट्टीचीही जोरदार चर्चा आहे. त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पटकथाही त्यानेच लिहिली आहे. एकहाती तिहेरी भूमिका साकारल्याने त्याचं चौफेर कौतुक होतंय. त्यामुळे त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.

हेही वाचा – ‘हम दिल दे चुके सनम’पासून ‘PS-1’पर्यंत ‘या’ चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली निवड नव्हती ऐश्वर्या

- Advertisement -

ऋषभ आता फक्त कन्नड अभिनेता राहिला नसून तो पॅन इंडिया अभिनेता झाला आहे. देशातील प्रत्येक प्रांतात त्याचे चाहते निर्माण झाले आहेत. या चित्रपटात ऋषभने शिवा नावाची व्यतिरेखा साकारली असून त्याने देव कोला या वनदेवतेचीही वेशभुषा केली आहे. सध्या ऋषभची जोरदार चर्चा असली तरीही त्याला या भूमिकेसाठी खूप त्याग करावा लागला आहे. जंगलाच्या देवतेला कन्नड भाषेत कांतारे म्हटलं जातं. या नावावरूनच कांतारा असं या चित्रपटाला नाव देण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये वनदेवतेला खूप महत्त्व आहे. या वनदेवतेची वेशभुषा करून लोकनृत्य सादर केले जातात. या वनदेवतेच्या म्हणजेच कोलाच्या वेशभुषेसाठी ऋषभने नॉन व्हेज सोडलं होतं. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता.

हेही वाचा – ‘कांतारा’मधील ‘वराहरूपम’ गाणं वापरण्यास न्यायदंडाधिकाऱ्यांकडून मनाई

- Advertisement -

देव कोलाचा सीन शूट करण्याच्या २० ते ३० दिवसाआधीच ऋषभने नॉन-व्हेज खाणं सोडून दिलं होतं, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे. देव कोलाची वेशभुषा जवळपास ५० ते ६० किलोंची होती, अशीही माहिती त्याने दिली. एवढ्या वजनाचे कपडे घातल्यानंतर तो फक्त नारळ पाणी प्यायचा. एवढंच नव्हे तर त्याला या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान आगीशीही सामना करावा लागला होता. एका सीनमध्ये त्याला जळत्या काठीने मारण्यात आलं आहे. यामुळे त्याची पाठ अक्षरशः भाजून निघाली होती.

हेही वाचा – ‘कांतारा’ला यश मिळत असतानाच ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायकचे दर्शन

ऋषभने थिएटरपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याने अनेक मालिकांमध्येही कामं केली आहेत. सुरुवातीच्या काळात त्याने उदरनिर्वाहासाठी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्ससुद्धा विकल्या आहेत. तर, काहीवेळ तो हॉटेलमध्येही काम करत होता.

कांतारा हा चित्रपट अवघ्या २० कोटींचा आहे. मात्र, चित्रपट रिलिज झाल्यापासून २५० कोटींहून अधिक कमाई झाली आहे. कांताराची कथा वेगळी असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -