घरमनोरंजनसईचा डिजीटल 'सन्यास'

सईचा डिजीटल ‘सन्यास’

Subscribe

बॉल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर यापासून राहणार दूर

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी नव-नवे ट्रेंड्स घेऊन येत असते. बाकी स्टार्स जे करत नाही, ते काहीतरी वेगळं करण्याचा विचार सई ताम्हणकर नेहमी करते. तसेच स्टाइलिश लूक्स, परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म, स्टँडअप कॉमेडी यांसाख्या अनेक कारणानं सई २०१९ मध्ये सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकरनं सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे, म्हणजेच ‘डिजीटल डिटॉक्स’चा पर्याय स्वीकारला आहे.

काय म्हणतं सई

‘ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रीय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही वेळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचं ठरवलं आहे’, असं सई म्हणाली आहे.

- Advertisement -

इन्स्टाग्रामवर १० लाख फॉलोअर्स

सई ताम्हणकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव असतं. तिचे फोटो पाहण्यासाठी अनेक चाहते तिला फॉलो करतात. सध्या सईचे इंन्स्टाग्रामवर साडे नऊ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स असून ट्विटरवर ७९ हजार तर फेसबुकवर १० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अशावेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करत आहे.

सई आणणार का सरप्राइज

अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स सर्वाधिक कसे वाढतील या प्रयत्नात असतात पण सईनं यासर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जेव्हा केव्हा सई सोशल मीडियावर परतेल तेव्हा हटके सरप्राइजेस घेऊन येणार का? याची चाहते वाट पाहत आहेत.

- Advertisement -

वाचा – १४ फेब्रुवारीला मुलीचं लग्न, आईला हवंय संरक्षण

वाचा – सई ताम्हणकरची ‘स्टँडअप कॉमेडी’त एन्ट्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -