घरमनोरंजन'बंटी और बबली'च्या सीक्वलमध्ये बिग-बींच्या जागी दिसणार सैफ!

‘बंटी और बबली’च्या सीक्वलमध्ये बिग-बींच्या जागी दिसणार सैफ!

Subscribe

सैफ ही भूमिका करण्यास होकार देतो की नकार हे पाहणं महत्त्वपुर्ण ठरणार आहे

अभिषेक बच्चन आणि रानी मुखर्जी यांचा २००५ साली आलेला सुप्रसिद्ध चित्रपट ‘बंटी और बबली’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यास येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा सीक्वल येण्याच्या चर्चा चांगल्याच रंगत आहे. असे असताना यशराज फिल्मने सैफ अली खानला ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील विशेष भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली आहे.

यावेळी या चित्रपटात दोन युवा अभिनेत्यांना चोरांची भूमिका साकरणार असून सैफ अली खानला बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या जागी पोलीसाची भूमिका करण्याकरिता विचारणा करण्यात आली आहे. आता सैफ ही भूमिका करण्यास होकार देतो की नकार हे पाहणं महत्त्वपुर्ण ठरणार आहे. यापुर्वी ‘बंटी और बबली’च्या सीक्वलसाठी सैफ अली खानच्या आधी गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदीला विचारण्यात आले होते.

- Advertisement -

‘बंटी और बबली’ या चित्रपटातील अभिषेक बच्चन, रानी मुखर्जी शिवाय अमिताभ बच्चन देखील दिसले होते. मात्र येणाऱ्या सीक्वलमध्ये अमिताभ बच्चन दिसणार की नाही हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. या सीक्वलची चित्रपटाची निर्मिती देखील यशराज फिल्म करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -