घरताज्या घडामोडीरोहित शेट्टीच्या चित्रपटात चुलबूल पांडे आणि सिंघम येणार एकत्र!

रोहित शेट्टीच्या चित्रपटात चुलबूल पांडे आणि सिंघम येणार एकत्र!

Subscribe

बॉलिवूड चित्रपटात जेव्हा दोन मोठे सुपरस्टार एकत्र दिसण्याची घोषणा होते, तेव्हा चाहत्यांमध्ये खूप उत्साह वाढतो. अनेक चित्रपटात दोन मोठे सुपरस्टार एकत्र दिसले आहेत. पण आता लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात आता चुलबूल पांडे म्हणजेच सलमान खान आणि सिंघम म्हणजेच अजय देवगण एकत्र मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. (Salman Khan As Chulbul Pandey And Ajay Devgn As Singham Will Come Together For Rohit Shetty Next Film)

दरम्यान सलमान जी काही कमिटमेंट करतो ती तो नक्कीच पूर्ण करत असतो, हे सलमानच्या प्रत्येक चाहत्याला माहित असेल. अलीकडेच रोहित शेट्टी आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’चे प्रमोशन करण्यासाठी सलमान खानचा शो बिग बॉस सीझन १५च्या वीकेंडच्या वारमध्ये पोहोचला होता. त्यावेळेस रोहित शेट्टीने शोमधून जाताना सलमानकडून एक मोठी कमिटमेंट करून घेतली. यादरम्यान रोहित शेट्टी सिंघम आणि दबंग फ्रेंचाइजी एका मोठ्या पडद्यावर आणणार असल्याचे म्हटले. त्यामुळे सलमान रोहित शेट्टीला बिग बॉसच्या सेटवर नाही म्हणू शकला नाही आणि त्यामुळे सलमानने रोहित शेट्टीसोबत काम करण्यास होकार दिला.

- Advertisement -

जर रोहित शेट्टीने सिंघम आणि दबंगला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच वर्षानंतर सलमान खान आणि अजय देवगण मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या सलमान ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘अंतिम’ चित्रपटात सलमानसोबत त्याच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अजय देवगणजवळ ‘मेडे’, ‘रेड २’ आणि ‘गोलमाल ५’ हे चित्रपट आहेत. लवकरच अजयचा ‘मैदान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.


हेही वाचा – ‘माझी महाराष्ट्रीयन गर्लफ्रेंड होती तिने मला…’ अक्षय कुमारने थुकरटवाडीत सांगितलं सिक्रेट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -