बॉलिवूड विश्वातील भाईजान म्हणजे सलमान खानचा दबंग ३ प्रदर्शित झाला नाही तर २०२० मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हे पोस्टर रिलीज करताना सलमान खानने लिहिले की, ‘तुम्ही विचारले होते न दबंग ३ नंतर काय?’ याचेच उत्तर देत सलमानने हे पोस्टर शेअर केले आहे. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Aap he ne poocha tha 'Dabangg 3' ke baad kya? What and when? Yeh lo answer #EidRadheKi https://t.co/mKp4gYsoUz@arbaazSkhan @SohailKhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @atulreellife @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @saffronbrdmedia @ReelLifeProdn
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 18, 2019
सलमान खानचा ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ईद राधे की (Eid Radhe Ki)’असे आहे. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांध्ये बजरंगी बनल्यानंतर सलमान खान आता राधे साकारत मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे. ईदच्या दिवशी २० डिसेंबरला दबंग ३ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यानंतर अजून एक चित्रपट येणार आहे. मात्र त्याचे नाव राधे नसेल, असे एका मुलाखतीत सलमान खानने सांगितले.
यापुर्वी सलमान खान भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह (Insha Allah)’चित्रपटाच्या माध्यमातून ईदच्या दिवशीच सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र, काही वाद-विवादामुळे सलमानने या चित्रपटातून माघार घेतली.