घरमनोरंजनसलमान खानने OTT बरोबर केली 5 वर्षांची डील

सलमान खानने OTT बरोबर केली 5 वर्षांची डील

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 109 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानंतर सलमान आता लवकरच ‘टायगर-3’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. दरम्यान, अशातच समोर आलेल्या बातमी नुसार सलमानने ओटीटीसोबत 5 वर्षाची डील केली आहे.

सलमानने केली OTT सोबत 5 वर्षाची डील

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने जानेवारीपासून सुरू झालेल्या एक्सक्लूसिव सॅटेलाइट हक्कांसाठी Zee5 सोबत 5 वर्षांचा करार केला आहे. या डील अंतर्गत प्रदर्शित होणारा त्यांचा पहिला चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. Zee5 आणि सलमानचे संबंधित खूप जुने आहेत. या प्लॅटफॉर्मने सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट डिजिटलवर लाँच केला होता. ज्यावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, सलमानचा ‘टायगर-3’ चित्रपट या डीलचा भाग नसेल. कारण, यशराज फिल्म्सने दुसऱ्या प्लॅटफॉर्मशी डील केलेली आहे.

- Advertisement -

‘टायगर-3’ या दिवशी होणार प्रदर्शित

‘टायगर-3’ मध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्याशिवाय इमरान हाश्मीही देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

‘टायगर 3’च्या शूटिंगदरम्यान सलमान खान जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -