Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'टायगर 3'च्या शूटिंगदरम्यान सलमान खान जखमी

‘टायगर 3’च्या शूटिंगदरम्यान सलमान खान जखमी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 109 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानंतर सलमान आता लवकरच ‘टायगर-3’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. याचं चित्रपटाच्या शूटदरम्यान सलमान जखमी झाला होता. याबाबत सोशल मीडियावरुन सलमानने फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

‘टायगर 3’च्या शूटिंगदरम्यान सलमान खान जखमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकत्याच काही वेळापूर्वी सलमानने फोटो शेअर करत शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती दिली आहे. यात सलमानने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नाही, परंतु त्याच्या खांद्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत सलमान खानने लिहिलंय की, “जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही संपूर्ण जगाचे ओझे वाहून नेले आहे, तेव्हा तो म्हणतो जग सोड, मला आधी 5 किलोचे डंबेल उचलून दाखवा. टायगर जखमी झाला आहे”. यासोबतच खाली #टायगर असे देखील लिहिलं आहे.

सलमानच्या चित्रपटात शाहरुख खान करणार कॅमिओ

- Advertisement -

सलमान खानने शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये कॅमिओ केला होता, त्यानंतर आता शाहरुख खानही सलमान खानच्या ‘टायगर-3’ मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. शाहरुख खान सध्या कतरिना आणि सलमान खानसोबत त्याच्या काही भागांची शूटिंग करत आहे. ‘टायगर-3’ मध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्याशिवाय इमरान हाश्मीही देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

मला 25 पेक्षा जास्त ब्रँड्स एंडोर्समेंटमधून काढले कारण… कंगनाची पोस्ट चर्चेत

- Advertisment -