घरमनोरंजनसलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'चे शूटिंग झाले पूर्ण

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चे शूटिंग झाले पूर्ण

Subscribe

अलीकडेच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टिझर प्रदर्शित झाला. या टिझरला दर्शकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर नवीन लूक शेअर करत आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’चे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे.

अशातच, या घोषणेमुळे सिनेप्रेमींमध्ये उत्साहाची लहर आली असून, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, सलमानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, फोटोमध्ये तो खूपच चार्मिंग दिसत आहे. आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित बहुतांश माहिती गुप्त ठेवली असून, फक्त काही लूक्स आणि टिझर रिलीज केला आहे जेणेकरून या सिनेमाबद्दल दर्शकांचा उत्साह वाढेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.


हेही वाचा :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं किस ; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -