घरदेश-विदेशकाँग्रेस हा देशाचा राहुकाळ, तर भाजप अमृतकाळ; निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेस हा देशाचा राहुकाळ, तर भाजप अमृतकाळ; निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेला सविस्तर उत्तर दिले आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी काँग्रेस हा देशाचा राहुकाळ होता, तर मोदी सरकारच्या काळात देशाने अमृतकाळाच्या दिशेने वाटचाल सुरू केली अशा शब्दात काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. एका खासदाराने केलेल्या टीकेवर अर्थमंत्र्यांनी ही टीका केली आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यूपीएच्या काळात झालेल्या अनेक मोठ्या घोटाळ्यांसंदर्भात विरोधकांवर निशाणा साधला आणि पंतप्रधान मोदी सरकारने आणलेल्या अनेक योजनांबाबत सविस्तर प्रतिक्रियाही दिली.

यूपीए सरकारच्या काळात मोठ्या घोटाळ्यांचा संदर्भ देत निर्मला सीतारामन यांनी तो देशासाठी राहुकाल होता असे वर्णन केले. यावर अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, “राहुकाळ तेव्हा होता जेव्हा तात्कालीन पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भेटणार होते. त्यांनी जे विधेयक सादर केले ते मीडियासमोर फाडून टाकण्यात आले आहे.”

- Advertisement -

“राहुकाळ म्हणजे तो काळ ज्याला G-23 असे म्हणतात. आमचा अमृतकाळ त्यांचा राहूकाळ होता. पक्षाचे वरिष्ठ नेते पक्ष सोडून बाहेर पडत आहेत, हा राहूकाळ आहे. राहुकाळाचा सामना करणाऱ्या काँग्रेस पक्षाला 44 जागा मिळाल्या आहेत आणि त्यातून बाहेर पडता येत नाही, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे राहुकाळ आहे… जिथे असे म्हणतात की, “मी मुलगी आहे, लढू शकते”… पण राजस्थानमध्ये मुली लढू शकत नाही. तिथे रोज काही ना काही घडत आहे.

या टीकेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रोजगार, जीडीपीच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच कोरोना महामारीमुळे देशाचे सकल देशांतर्गत जीडीपी 2020-21 या आर्थिक वर्षात 9.57 लाख कोटी रुपयांनी घसरल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

तसेच बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजना (ECLGS) अंतर्गत 3.1 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. तसेच कोरोनामुळे महामारीमुळे एमएसएमई क्षेत्रावर वाईट परिणाम झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी निर्मला सीतारामन यांनी ECLG योजनेअंतर्गत एमएसएमईंना 2.36 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची  माहिती दिली आहे. तसेच नरेंद्र मोदी सरकारने देशाला ‘अमृतकाळा’कडे नेण्यासाठी अनेक पावले उचलली असल्याचे म्हणत जन धन योजनेमुळे आज सर्व भारतीय सर्व बँकांशी जोडले असल्याचे सांगितले आहे. या अंतर्गत नागरिकांच्या खात्यांमध्ये 1.57 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ५५.६ टक्के खाती महिलांची आहेत. अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

वर्ष 2020-21 मध्ये देशात 44 युनिकॉर्न तयार झाली. जे ‘अमृत काळा’चे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले, देशातील रोजगाराची स्थिती आता सुधारत आहे. तर शहरांमधील बेरोजगारी आता कोविडपूर्व पातळीपर्यंत खाली आलीय. याशिवाय 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.2 कोटी अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याची माहितीही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.


Airtel नेटवर्क झालंय डाउन, मोबाईल धारकांना होतोय त्रास


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -