घरमनोरंजनशाहरूख खान भारावला, जेव्हा सुहाना बनली ज्युलिएट

शाहरूख खान भारावला, जेव्हा सुहाना बनली ज्युलिएट

Subscribe

शाहरूख खानचं त्याच्या मुलीवर किती प्रेम आहे हे जगजाहीर आहे. सुहानाही कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीये. बॉलिवूडमधल्या पदापर्णाआधीच तीचा मोठा फॅनफॉलोअर आहे. सुहाना कायम सोशलमिडीयावर अक्टिव्ह असते. सुहाना कायम आपले हटके फोटो सोशलमिडीयावर शेअर करत असते. या फोटला चाहत्यांची पसंतीही मिळते. यावेळ शाहरूखने आपल्या लाडक्या लेकीसोबत एक फोटो सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये शाहरूखने सुहानाला प्रेमाने जवळ घेतलं आहे. या फोटोत सुहानाच्या हातात गुलाबाची फुलं आहेत. हा फोटो शेअर करताना शाहरूख खानने लिहीलं आहे की, माझ्या ज्यूलिएट सोबत. हा खूप सुंदर अनुभव होता. सगळ्या कलाकारांनी अप्रतिम कामं केली आहेत. ज्युलिएट सह संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.

- Advertisement -

suhana Khan as Juliet

सध्या सुहाना लंडनच्या एका कॉलेजमध्ये आपलं शिक्षण पुर्ण करत आहे. यावेळी सुहानाने कॉलेजच्या एका नाटकात भाग घेतला होता. या नाटकात ती ज्युलिएटची भुमिका साकारली. शाहरूख आपल्या लाडक्या लेकीचं नाटक बघायला लंडनला गेला होता. आपल्या लेकीच नाटक बघून तो खूपच भारावला. नाटक पाहिल्यानंतर शाहरूखने सुहाना आणि तिच्या टीमचं कौतूक केलं.

- Advertisement -

प्रतिक्षा बॉलिवूड एन्ट्रीची

सुहाना बॉलिवूडमध्ये कधी एन्ट्री करणार याची प्रतिक्षा तीच्या चाहत्यांना आहे. ती लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचीही सध्या सगळीकडे चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सुहाना वोग मॅगझिनच्या कव्हरपेज झळकली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -