घरताज्या घडामोडीमधुबालाच्या सांगण्यावरून शम्मी कपूर यांनी बिअर प्यायला सुरूवात केली...

मधुबालाच्या सांगण्यावरून शम्मी कपूर यांनी बिअर प्यायला सुरूवात केली…

Subscribe

सुपरस्टार अभिनेता शम्मी कपूर यांची आज पुण्यतिथी. शम्मू कपूर यांच्या अभिनयाच्या  वेगळ्या स्टाईलमुळे त्यांची ओळख आजही बॉलिवूडमध्ये कायम आहे. त्यांच्या या अनोख्या स्टाईलची अनेक कलाकारांनी नक्कल करण्याचा प्रयत्न केला पण शम्मी कपूर यांची ही स्टाईल कधीच कोणाला जमली नाही. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही कधीच न ऐकलेला एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सन १९४८ मध्ये शम्मी कपूर यांनी सह कलाकार म्हणून सिनेमांमध्ये कामं करायला सुरूवात कली. त्यावेळी त्यांना मासिक पन्नास रुपये पगार मिळायचा. त्यामुळे पुढील चार वर्षे शम्मी कपूर वडिलांच्या पृथ्वी थिएटरजवळच राहिले.

- Advertisement -

मधूबाला यांच्या सांगण्यावरून बिअर प्यायला सुरूवात

सुरुवातीच्या काळात शम्मी कपूर यांचे वजन अतिशय कमी होते. त्यांना असं सडपातळ पाहून मधुबाला त्यांना म्हणाली,  मला तुमच्याबरोबर काम करायला आवडत नाही, मी तुमची नायिका शोभत नाही. मला वाटतं तुम्ही तुमचं वजन वाढवायला हवं. शम्मी आणि मधुबालाने बॉयफ्रेंड नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. शम्मी कपूर यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते- ‘मधुबालाचे हे बोलणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी बिअर पिण्यास सुरुवात केली. लवकरात लवकर वजन वाढवायचा हाच मार्ग मला त्यावेळी सुचला.

- Advertisement -

शम्मी कपूर यांना कारकिर्दीच्या सुरुवातीला विशेष ओळख मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट महत्त्वाचा होता. ते म्हणाले होते- मला माहित आहे की जर हा चित्रपट चालला नाही तर माझं करिअर बुडणार आहे. या चित्रपटासाठी शम्मी कपूरने आपला लूक बदलला. क्लीन शेव लुक आणि हेअर स्टाईल केली.

शम्मी कपूर यांनी ‘तुमसा नहीं देखा’, ‘दिल देके देखो’, ‘सिंगापूर’, ‘जंगल’, ‘कॉलेज गर्ल’, ‘प्रोफेसर’, ‘चायना टाउन’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘काश्मीर की काली’ या चित्रपटांबरोबरच ‘जानवर’, ‘तिसरा मजला’, ‘अंदाज’ आणि ‘सच्चाई’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. १४ ऑगस्ट २०११मध्ये त्यांच निधन झालं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -