Sidharthच्या मृत्यूच्या धक्क्यातून Shehnaaz सावरली, पुन्हा करणार कमबॅक

Shehnaaz Gill agrees to return to work after Sidharth Shukla's death
Sidharthच्या मृत्यूच्या धक्क्यातून Shehnaaz सावरली, पुन्हा करणार कमबॅक

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. सर्वांसाठी सिद्धार्थचे अचानक जाणे धक्का देणारे होते. सर्वात मोठा धक्का त्याची मैत्रीण शहनाज गिलला बसला. शहनाजला मानसिक धक्का बसला होता. रडूनरडून शहनाजची अवस्था खूप बिकट झाली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर ती कुठेही दिसली नाही. ना सोशल मीडियावर ना कुठल्याही माध्यमांशी बोलताना ती दिसली. पण आता शहनाज गिल पुन्हा काम करण्यास सुरुवात करणार आहे. एका चित्रपट निर्मात्याने याबाबत सांगितले असून अजूनपर्यंत यावर शहनाजची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

चित्रपट निर्माता दिलजीत थिंड म्हणाला की, ‘मी शहनाजच्या टीमसोबत सतत संपर्कात होतो आणि तिच्या संबंधित दररोज अपडेट मिळत असते. ती एक प्रोफेशनल मुलगी आहे. मी आनंदी आहे, ती प्रोमोशनल सॉन्गच्या शूटिंग युनिटसोबत काम करण्यासाठी सहमत झाली आहे. आम्ही याची शूटिंग यूकेमध्ये किंवा भारतात करू. शहनाजचा विजावर अवलंबून आहे. ७ ऑक्टोबरला शूटिंग होणार आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाजनला लागेल्या मानसिक धक्क्याबद्दल बोलताना थिंडे म्हणाला की, ‘ती सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. अजूनही ती सावरली नाही आहे. प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तिला हिंमत एकजुट करावी लागेल. ती आमच्यासाठी एक कुटुंबातील सदस्य असल्यासारखी आहे. त्यामुळे आम्ही तिच्यावर काही थोपवू इच्छित नाही. तिने आपल्या मर्जीनुसार पूर्ण वेळ घेऊन काम करावे. आमचा तिच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव नाही आहे.’


हेही वाचा – मोहम्मद शमीच्या पत्नीचा टॉपलेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल