घरताज्या घडामोडीViral Video: ‘हौंसला रख’ चित्रपटच्या प्रमोशन दरम्यान शहनाज अचानक ढसाढसा लागली रडू

Viral Video: ‘हौंसला रख’ चित्रपटच्या प्रमोशन दरम्यान शहनाज अचानक ढसाढसा लागली रडू

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल एकटी पडली आहे, हे त्यांच्या सर्व चाहत्यांना माहित आहे. त्यामुळे सिद्धार्थनाच्या निधनापासून सिडनाजचे चाहते सतत पोस्टच्या माध्यमातून शहनाजला खंबीरपणे उभं राहण्याचा सल्ला देत आहेत. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसत आहेत. यादरम्यान शहनाज एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या ‘हौंसला रख’ चित्रपटच्या प्रमोशनदरम्यान सिद्धार्थ शुक्लासाठी ढसाढसा रडताना दिसत आहे.

शहनाजचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा चाहते खूप भावूक झाले आहेत. व्हिडिओमध्ये पाहू शकता, कशी शहनाज गिल ढसाढसा रडताना दिसत आहे. यादरम्यान शहनाजसोबत असलेला दिलजीत दोसांझ तिचे सांत्वन करताना दिसत आहे. पंजाबी चित्रपट ‘हौंसला रख’च्या प्रमोशनमधील हा न पाहलेला व्हिडिओ पाहून सर्व चाहते भावूक प्रतिक्रिया देत आहे.

- Advertisement -

दरम्यान सप्टेंबर महिन्यात शहनाज गिलचा खूप जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला होता. अवघ्या वयाच्या ४० वर्षी सिद्धार्थने अखरेचा श्वास घेतला. त्यामुळे शहनाज गेल्या काही दिवसांपासून माध्यमासमोर येत नव्हती. पण मागच्या महिन्यात शहनाजचा ‘हौंसला रख’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शहनाज पहिल्यांदा माध्यमांसमोर आली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ चित्रपटामुळे आलियाच्या Gangubai Kathiawadi चित्रपटच्या प्रदर्शनाचा मुहूर्त टळला


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -