घरमनोरंजनशिल्पाच्या पती राजने पूर्व पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगितले कारण

शिल्पाच्या पती राजने पूर्व पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगितले कारण

Subscribe

राज कुंद्राने 2006 साली पहिल्या पत्नी कवितासोबत घटस्फोट घेतला होता. कविताच्या व्हायरल होत अलेल्या व्हिडियोमुळे शिल्पाला त्रास होत अल्याचे दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर कमालिची रंगत आहे. राज कुंद्राची पुर्व पत्नी कविता कुंद्रा (Kavita Kundra) बद्दल काही खळबळजनक खुलासा केला आहे. काहि दिवसांपुर्वी शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसाआधी कविताचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.आणि या व्हिडियोमध्ये कविता शिल्पावर तिचा संसार मोडल्याचा आरोप लावताना दिसत आहे. अशातच राज कुंद्राने त्याचा व कविताच्या घटस्फोटाचे कारण स्पष्ट करत शिल्पा यासं जबाबदार नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच राजची बहिण रिना कुद्रांचा पती आणि कवितामध्ये जवळीक निर्माण झाल्याने दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला अल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच रिनाने देखिल या वृत्ताला दूजोरा दिला आहे.सध्या कविता,राज,शिल्पा यांच्यामधिल कॉन्ट्रोवर्सीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. याचदरम्यान शिल्पा शेट्टीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. एका इंस्टा स्टोरीमध्ये शिल्पाने एका पुस्तकाचा फोटो शेअर केला होता सध्या शिल्पा या पुस्तकाचे वाचन करताना दिसत आहे.

- Advertisement -

 

फोटोत ‘शेयर्ड सफरिंग्स’ पान दिसत आहे त्यावर असं लिहलं आहे की, “चांगुलपणा एकाकीपणात अस्तित्त्वात नाही. चांगुलपणाची प्रत्येक कृती मोठ्या चांगल्यासाठी योगदान देते. त्याचप्रमाणे, चांगुलपणाच्या कोणत्याही कृतीत विलंब होतो किंवा अयशस्वी होतो तेव्हा आपल्या सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. ‘कधीकधी आपण चांगल्या लोकांवर वाईट गोष्टी घडल्याचे पाहतो किंवा ऐकत असतो. हे पाहून आम्ही काहीही करु शकत नाही कारण या घटना आपल्यापासून खूप दूर किंवा डिस्कनेक्ट झाल्यासारखे दिसत आहेत. पण जेव्हा जगात कोठेही एखाद्या चांगल्या व्यक्तीवर हल्ला केला जातो, जखमी होतो, अटक केली जाते, तुरुंगात टाकले जाते, छळ केला जातो किंवा ठार मारतो तेव्हा आपण सर्वजण कमी पडतो.”

- Advertisement -

राज कुंद्राने 2006 साली पहिल्या पत्नी कवितासोबत घटस्फोट घेतला होता. कविताच्या व्हायरल होत अलेल्या व्हिडियोमुळे शिल्पाला त्रास होत अल्याचे दिसून येत आहे. यासाठीच राजने कविता आणि माझ्या घटस्फोटाशी शिल्पाचा काहिहि संबध नसल्याचे उघड केले.


हे हि वाचा – अंकिताचे सोशल मीडियावर कमबॅक,विक्की जैन सोबतचे फोटो शेअर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -