घरताज्या घडामोडीशरद पवार यांच्या दौरा न करण्याच्या आवाहनावर फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले मी...

शरद पवार यांच्या दौरा न करण्याच्या आवाहनावर फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले मी येत्या..

Subscribe

आमचे दौरे महत्त्वाचे आहेत. आम्ही गेल्यावर शासकीय यंत्रणा जागी होते आणि यंत्रणा कामाला लागते.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. पूरग्रस्त भागात काही ठिकाणी पाणी ओसरले असल्यामुळे राजकीय नेते मंडळी दौरे करत आहे. पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. परंतून नेत्यांनी दौरे टाळावेत असे आवाहन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून मी येत्या दोन ते तीन दिवसांत दौरा करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांचे वक्तव्य योग्य आहे परंतू आमच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी त्यांना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दौरा न करण्याचे आवाहन केले आहे असा प्रश्न केला असता त्यावर फडणवीस यानी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना जे दौरे करणारे आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणांवर येऊ नये. मी विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी उपस्थित नसतेच. तसा सरकारने जीआरच काढला आहे. मात्र आमचे दौरे महत्त्वाचे आहेत. आम्ही गेल्यावर शासकीय यंत्रणा जागी होते आणि यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचे लोकांचा आक्रोश समजून घेता येतो आणि सरकारपर्यंत पोहचवता येतो. यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्याचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, बचावकार्य आपल्या दौऱ्यामुळे थांबू नये ते त्यांचे बरोबर आहे. परंतु आम्ही दौरा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पूरपरिस्थिती ही बऱ्यापैकी आहे आणि नवीनवीन आव्हाने आहेत. राज्य सरकार कमी करत आहे असं म्हणार नाही परंतू आपल्या सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. राज्य सरकार जिथं कमी पडत आहे तिथे त्यांना दाखवून देत आहोत की, हे अजून केले पाहिजे. आता एकतर लोकांच्या मनातील भय दूर करावे लागणार आहे. आपल्याला पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकपेक्षा अधिक करावा लागतो परंतू त्यांच्या गावांत पूर येतो त्यामुळे ते नेत नाहीत. त्यामुळे नेहमी विसर्ग सुरु ठेवला आणि आपला पाणी साठ्याच्या पातळीचा विचार न करता नियोजन केलं तर पूरपरिस्थिती उद्भवणार नाही असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.


हेही वाचा : भाजपकडून कोकणाला ९ ट्रक जीवनावश्यक वस्तू रवाना, दररोज मदत पोहचवणार – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -