घरमनोरंजनशिल्पा शेट्टी- राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?

Subscribe

पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मिती करत ते विविध पॉर्न अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणामुळे शिल्पा शेट्टीलाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. तर कुटुंबियांनाही अनेक टीका सहन कराव्या लागल्या. अशातच शिल्पा शेट्टी आता पती राज कुंद्रापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतअसल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत.

एका मीडिया रिपोर्टनुसार, पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशातच शिल्पाच्या एका मित्राने तिच्या घरात सुरु असलेल्या काही खासगी निर्णयासंदर्भात मोठे खुलासे केले आहेत. शिल्पाच्या मित्राने सांगितले की, पती राज कुंद्रा अशाप्रकारे काही अप्रामाणिक मार्गाने पैसे कमावत असल्याचा शिल्पाला अंदाजही नव्हता. त्यामुळे शिल्पाला आता पती राज कुंद्राने दिलेल्या भेटवस्तूंना हात लावण्याचीही इच्छा होत नाही. तो मित्र पुढे सांगतो की, शिल्पा आता आत्मनिर्भर असून ती आपल्या मुलांचे संगोपन करु शकते.

- Advertisement -

शिल्पाने इंडस्ट्रीतील आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितले आहे की, ती ‘हंगामा २’ आणि ‘निकम्मा’ चित्रपटांनंतर अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. अशातच दिग्दर्शक अनुराग बसु आणि प्रियदर्शन यांनी आगामी प्रोजेक्टमध्ये शिल्पा शेट्टीला रोल करण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिल्पाकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे येणार काळचं सांगू शकतो की, शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रापासून विभक्त होणार की नाही.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने माध्यमांसमोर येत केलेल्या वक्तव्यांमुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आले. यात तिने सांगितले की, माझा पती राज कुंद्रा पॉर्न फिल्म नाही तर एरॉटिक कंटेंट असणाऱ्या फिल्म बनवतो. त्यामुळे तो निर्दोष आहे. तर काही दिवसांनी तिने पुन्हा एक पोस्ट करत मुलांच्या भविष्यासाठी वैयक्तिक आयुष्यावर टीप्पणी करु नका असे आवाहन केले. या सर्व घडामोडींमध्ये शिल्पा शेट्टीने हातात असलेले सर्व प्रोजेक्ट थांबवल्याच्या बातम्या येत होत्या. तर ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मधूनही ती बाहेर पडल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने शोमध्य़े नव्याने एंट्री घेतली.

- Advertisement -

अखेर तो क्षण आलाच, श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात, शक्ती कपूरनी सांगितली डेट?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -