घरमनोरंजन’शिष्यवृत्ती’चे मोशन पोस्टर शिक्षकांच्याच हस्ते रिलीज

’शिष्यवृत्ती’चे मोशन पोस्टर शिक्षकांच्याच हस्ते रिलीज

Subscribe

शिक्षक दिनाचे औचित्य साधत ‘शिष्यवृत्ती’ या सिनेमाचे मोशन पोस्टर मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात शिक्षकांच्या हस्ते रिलीज करण्यात आले.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वाची कथा ‘शिष्यवृत्ती’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती ओ थ्री शॉपिंग, साज इंटरटेनमेंट सहनिर्मित आणि अखिल देसाई यांनी दिग्दर्शन केले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या सिनेमाचे मोशन पोस्टर मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात शिक्षकांच्या हस्ते रिलीज करण्यात आले. यावेळी शिष्यवृत्ती सिनेमातील दुष्यंत वाघ, अंशुमन विचारे, झील पाटील, रुद्र ढोरे, प्रशांत नागरे इ. कलाकार उपस्थित होते. दिग्दर्शक अखिल देसाई सांगतात की, आयुष्यात प्रगतीच्या वाटेवर आपल्याला शिक्षक हे असे गुरु भेटतात जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आता सिनेमाची पूर्ण गोष्ट जरी उलगडली गेली नसली तरी सिनेमाचा बाज प्रेक्षकांना कळू शकतो. शिवाय प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी सिनेमात आपल्याला पाहू शकतो, हीच सिनेमाची विशेष बाब आहे. सिनेमामध्ये देखील अशाच एका शिक्षक आणि शिष्याची गोष्ट दाखवली आहे.

या सिनेमात मी एका शिस्तप्रिय शिक्षकाची भूमिका साकारतोय. तो शिस्तप्रिय जरी असला तरी विद्यार्थ्यांना मारणं,ओरडणं त्याला मान्य नाही. गावातील एका हुशार पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण घेण्याची अडचण असलेल्या विद्यार्थ्याला तो शिक्षक कशा प्रकारे मदत करतो. ही सगळी कथा म्हणजे शिष्यवृत्ती सिनेमा होय.– दुष्यंत वाघ, अभिनेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -