घरताज्या घडामोडीSidharth Shukla पंचतत्वात विलीन; बद्मकुमारी विधीनुसार झाले अंत्यसंस्कार

Sidharth Shukla पंचतत्वात विलीन; बद्मकुमारी विधीनुसार झाले अंत्यसंस्कार

Subscribe

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आज पंचतत्वात विलीन झाला आहे. मुंबईतील ओशिवरा (mumbai oshiwara) स्मशानभूमीत ब्रह्मकुमारी विधीनुसार सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या मुलाला थरथरत्या हाताने सिद्धार्थच्या आईने अग्नी दिली. त्याची खास मैत्रिण शेहशाज गिलीने (shehnaz gill) अंत्यसंस्कारा दरम्यान पूजा केली. सिद्धार्थ शुक्लाचा निधनाची बातमी ऐकून मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. कोणालाच सिद्धार्थच्या अचानक या जगातून जाण्यावर विश्वास बसत नाही आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचा निरोप देताना चाहत्याचे अश्रू अनावर झाले. त्याची सर्वात जवळची मैत्रीण शेहनाज गिल कोणासोबत बोलण्याचा मनस्थितीतही नाही आहे. सिद्धार्थचे निधन झाल्यापासून तिने कोणत्याही माध्यमाला प्रतिक्रिया दिली नाही आहे.

काल गुरुवारी, सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाल्याचे समोर आले. कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळी १०.३० वाजता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीसह, टेलिव्हिजनदृष्टीत हळहळ व्यक्त होऊ लागली. सिद्धार्थच्या अचानक एक्झिटमुळे प्रत्येकाला धक्का बसला. आज सिद्धार्थचा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यामध्ये सिद्धार्थचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याच दिसत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच केमिकल अॅनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजी अहवालासाठी त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. या दोन अहवालामधूनच सिद्धार्थच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे? हे कळणार आहे.

- Advertisement -

दरम्यान सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारच्या वेळी जवळचे लोकं उपस्थित होते. काही कलाकारांना गर्दी असल्यामुळे स्मशानात जाऊ दिले नाही. सिद्धार्थला शेवटचा निरोप देताना पावसाने देखील जोरदार हजेरी लावली होती. मात्र तरीदेखील चाहत्यांची गर्दी काही कमी झाली नाही. माहितीनुसार, सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारच्या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील पोहोचले होते.


हेही वाचा – Sidharth Shukla Death: सिद्धार्थला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचली शेहनाज गिल, व्हिडिओ व्हायरल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -