Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ...म्हणून तापसी पन्नूने 'कॉफी विथ करण' शोमध्ये जायला दिला नकार

…म्हणून तापसी पन्नूने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये जायला दिला नकार

Subscribe

तापसी पन्नू त्याच्या कार्यक्रमाचा भाग का नाही बनली असं ज्युरीने करण जोहरला विचारताच करण म्हणाला, कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा हा नवा सिझन केवळ 12 भागांचाच आहे.

प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेल्या कार्यक्रमांमध्ये कॉफी विथ करण (coffee with karan) या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत असते. प्रेक्षक सुद्धा या कार्यक्रमाला पसंती देतात. कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा सातवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. पण अभिनेत्री तापसी पन्नू ही मात्र कॉफी विथ करण या कार्यक्रमात सहभागी होणार नाही अशा चर्चा सुरु आहेत. त्यावरच आता स्वतः करण जोहर(karan johar) यानेच खुलासा केला आहे.

हे ही वाचा – उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

- Advertisement -

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 13 व्या भागात कलाकारांना अवॉर्ड दिले जाणार आहेत. यासाठी स्पेशल गेस्ट तन्मय भट, कुशा कपिला, दानिश सैत आणि निहारिका एन एम हे कलाकार दिसणार आहेत. या मध्ये प्रश्न – उत्तरांचा राउंड सुद्धा होणार आहे. याच दरम्यान तापसी पन्नू या कार्यक्रमात का सहभागी होणार नाही याचं सुद्धा उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

तापसी पन्नू त्याच्या कार्यक्रमाचा भाग का नाही बनली असं ज्युरीने करण जोहरला विचारताच करण म्हणाला, कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा हा नवा सिझन केवळ 12 भागांचाच आहे. तापसीला एवढंच संगतो की, मी तुला माझ्या कार्यक्रमामध्ये येण्याची विनंती करतो. जेणेकरून आम्ही एक रोमांचक कॉन्टेन्ट तयार करू शकू. पण तापसी मात्र या कार्यक्रमात येण्यास नकार दिला. त्यामुळे मला खूप वाईट वाटले. असंही करण जोहर म्हणाला.

हे ही वाचा – कतरिना-विक्कीच्या लग्नाचं आमंत्रण न मिळाल्याची करण जोहरने व्यक्त केली खंत

दरम्यान, तापसी पन्नूला (tapasi pannu) कॉफी विथ करण कार्यक्रमामध्ये सहभागी झाली नाही याविषयी विचारल्यावर तेव्हा ती म्हणाली, की, “माझं सेक्स लाईफ एवढं इंटरेस्टिंग नाहीये की त्यामुळे तिला कार्यक्रमात बोलवण्यात यावं.” तापसीचं हेच वक्तव्य सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -