घरमनोरंजनSooryavanshi Trailer : 'पोलीस धर्म बघून नाही तर क्रिमीनल रेकॉर्ड बघून ठोकतात'

Sooryavanshi Trailer : ‘पोलीस धर्म बघून नाही तर क्रिमीनल रेकॉर्ड बघून ठोकतात’

Subscribe

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. अखेर या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ मुख्य भुमिकेत आहेत. सोशल मीडियावर या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून या बिग बजेट चित्रपटाची चर्चा आहे. सोशल मीडियावर तर या चित्रपटाचे लीक फूटेज सातत्याने व्हायरल होत आहेत. त्यामुळे ‘सूर्यवंशी’ बाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आज अधिकृतरित्या प्रदर्शित झाला आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये

चित्रपटाचा ट्रेलरबघून लक्षात येत की, चित्रपट मुंबईत झालेल्या दहशतवादावर आधारीत आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हा हल्ला रोखण्याची जबाबदारी अक्षय कुमारवर आहे. १९९३ साली झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये केवळ एक किलो विस्फोटकं वापरण्यात आली होती. आजही मुंबईत ६०० किलो विस्फोटकं कुठेतही लपवून ठेवण्यात आली आहेत. ही विस्फोटकं शोधण्याच काम अक्षय कुमार करताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यानंतर अक्षयचे थक्क करणारे स्टंट दिसतात. त्याचप्रमाणे ट्रेलरच्या शेवटी अजय देवगण आणि रणवीर सिंगची एन्ट्री चित्रपटात होते. यावरून हे तिघं नंतर हा हल्ल्यापासून मुंबईला वाचवण्याचा प्रयत्न करतात.

- Advertisement -

येत्या २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे २४ मार्च रोजी मुंबईतील चित्रपटगृह रात्रंदिवस खुले राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -