घरमनोरंजनश्रीदेवी आणि मला 'त्या' दोघांनी एकाच रूममध्ये केले बंद, जया प्रदा यांनी...

श्रीदेवी आणि मला ‘त्या’ दोघांनी एकाच रूममध्ये केले बंद, जया प्रदा यांनी सांगितला किस्सा

Subscribe

जया प्रदा इंडियन आयडॉल सत्र 12 च्या मंचाची शोभा वाढवणार आहे. या भागात आपल्या जीवन प्रवासातील काही किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे.

सोनी टिव्हिवरील लोकप्रिय कार्यक्रम इंडियन आयडॉल सत्र 12 आगामी भाग घेऊन येण्यास सज्ज आहे. ज्या भागात महान बॉलीवूड सुंदरी जया प्रदा या शो ची शोभा वाढवणार आहे. स्पर्धेतले सगळे होतकरू गायक जयाजींच्या एकापेक्षा एक सुंदर अशा गाण्यांवर परफॉर्म करतील. जया प्रदा सेट्सवर येणार म्हणून सगळे स्पर्धक खूप आनंदले आहेत. तसेच कार्यक्रमाचा होस्ट जय भानुशाली, परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया या खास पाहुणीचे आपल्या शो मध्ये स्वागत करताना खूप उत्साहात आहेत. जया प्रदा इंडियन आयडॉल सत्र 12 च्या मंचाची शोभा वाढवणार आहे. या भागात आपल्या जीवन प्रवासातील काही किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे. याबाबत जयाप्रदाने यांनी त्याच्यांत आणि श्रीदेवीमध्ये कधीच भावनिक नाते नव्हते आणि सेटवर आम्ही कधी एकमेकींशी बोललो नाही हे सांगितले. त्या म्हणाली की, श्रीदेवी ही बॉलीवूडमधली तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती. इंडियन आयडॉलच्या सेट्सवर सर्व अभिनेत्यांबरोबर आपले नाते कसे होते हे जया प्रदाकडून ऐकायला मिळेल.

श्रीदेवी आणि तिच्याबरोबरचे आपले नाते, याविषयी बोलताना जया प्रदा म्हणाली, “मी खूप नशीबवान आहे असे मी मानते. आमच्या दोघींमध्ये वैयक्तिक वितुष्ट कधीच नव्हते पण आमच्या तारा कधीच जुळल्या नाहीत. आम्ही कधीही एकमेकींशी नजर मिळवली नाही, कारण आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होती, मग ती पोशाखाची असो किंवा डान्सची! प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा आमचा एकमेकींशी परिचय करून देण्यात यायचा. आम्ही फक्त एकमेकींना ‘नमस्ते’ म्हणून निघून जायचो. मला अजून आठवते आहे की, मकसद चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस जितूजी आणि राजेश खन्ना जी यांनी आम्हां दोघींना एका मेकअप रूममध्ये एक तास कोंडून ठेवले होते, पण आम्ही दोघी एकमेकींशी एक शब्दही बोललो नाही आणि त्यानंतर सगळ्यांनी आमच्यासमोर हात टेकले. आज ती आपल्यात नाहीये, तर मला तिची खूप आठवण येत आहे. मला एकाकी वाटते आहे, कारण या बॉलीवूड उद्योगातली ती माझी मोठी प्रतिस्पर्धी होती. ती जर मला कुठूनही ऐकू शकत असेल, तर या मंचावरून मी हेच म्हणेन की, ‘आम्ही एकमेकींशी बोलू शकलो असतो तर बरे झाले असते.”

- Advertisement -

हे वाचा-  मराठी मालिकांचेही चित्रिकरण आता महाराष्ट्राबाहेर, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचे चित्रिकरण राज्याबाहेर होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -