घरताज्या घडामोडी'तुम्ही नेहमीच आमच्या मनात जिवंत रहाल' सुबोध भावेने व्यक्त केल्या भावना!

‘तुम्ही नेहमीच आमच्या मनात जिवंत रहाल’ सुबोध भावेने व्यक्त केल्या भावना!

Subscribe

अभिनेता सुबोध भावे याने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या निधनानंतर बॉलिवूड अद्याप सावरलंही नाही तोच बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली आणि बॉलिवूडला यातून सावरणे कठीण झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा परसरली आहे. फक्त २४ तासात बॉलिवूडने दोन जबरदस्त अभिनेते गमावले आहेत. दरम्यान अभिनेता सुबोध भावे याने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काय आहे ट्वीट मध्ये

“ऋषी कपूर काय कमाल ऊर्जा घेऊन तुम्ही आजवर वावरलात. तुमच्यासारखा कलावंत कधीच मरत नाही ऋषीजी. तुम्ही नेहमीच जिवंत आहात आमच्या मनात आणि रहाल.” असे ट्विट सुबोध भावेने केले आहे.

- Advertisement -

ऋषी कपूर यांनी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं ते त्यांचे वडील राज कपूर दिग्दर्शित आणि अभिनित मेरा नाम जोकर (१९७०) या सिनेमातून. या सिनेमात त्यांनी त्यांच्या वडिलांची लहानपणीची भुमिका साकारली होती. त्यानंतर ते पहिल्यांदा डिंपल कपाडियासोबत बॉबी (१९७३) या सिनेमात प्रमुख भुमिकेत झळकले. त्या काळात तरुणांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला होता. त्यामुळे पहिल्याच सिनेमानंतर ऋषी कपूर बॉलिवूडमध्ये ओळखले जाऊ लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -