घरमनोरंजनसुबोध भावेने 'टकटक २' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करत टीमला दिल्या शुभेच्छा

सुबोध भावेने ‘टकटक २’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करत टीमला दिल्या शुभेच्छा

Subscribe

'टकाटक २'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, त्यातील संवादांसोबतच कलाकारांचा अभिनय आणि गीतांवर तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षक खुश झाले आहेत. सोशल मिडियावर सुद्धा टकटक २ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्यापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपट सृष्टितील अष्टपैलू कलाकार म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. अभिनेता सुबोध भावे( subodh bhave) यांच्या हस्ते नुकताच ‘टकाटक २'(taka tak 2)चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी सुबोध भावे यांनी ‘टकाटक’च्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण टीमचं कौतुक सुद्धा केलं. ‘टकाटक २’ला बॅाक्स ऑफिसवर भरघोस यश मिळावं यासाठी सुबोध भावे यांनी शुभेच्छाही दिल्या. १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘टकाटक २’ हा चित्रपट प्रेक्षकांचं टकाटक मनोरंजन करणार आहे. ‘घे टकाटक दे टकाटक…’ आणि ‘लगीन घाई…’सारख्या ताल धरायला लावणार्‍या धम्माल गाण्यानंतर आता ‘टकाटक २’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, त्यातील संवादांसोबतच कलाकारांचा अभिनय आणि गीतांवर तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षक खुश झाले आहेत. सोशल मिडियावर सुद्धा टकटक २ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्यापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हे ही वाचा – शक्तिमान फेम मुकेश खन्नाने मुलींबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर नेटकरी भडकले

- Advertisement -

नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून ‘टकाटक २’ हा चित्रपट बनला आहे. याची कथा आणि पटकथाही मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. मित्रांचा ग्रुप, त्यांची धमाल-मस्ती, त्यांच्यातील मिश्किल संवाद, विनोदी आणि भावूक प्रसंग, मनोरंजक गाणी, पंचेस असलेली डायलॅागबाजी आणि या जोडीला पुन्हा काहीतरी वेगळा विचार घेऊन आल्याची चाहूल हा ‘टकाटक २’च्या ट्रेलरचा प्लस पॅाईंट आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेली गाणी, तरुण कलाकारांचा दमदार अभिनय, सामाजिक जाणिवेचं भान राखून विनोदाची किनार जोडून केलेलं दिग्दर्शन आणि साथीला असलेलं आशयघन कथानक ही ‘टकाटक २'(taka tak 2)ची बलस्थानं असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. ‘मैत्रीसाठी काय पण…’ असं म्हणत जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची कथा या चित्रपटात मंडली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Bigg Boss 4: ‘हे’ सेलिब्रिटी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात होणार सहभागी

‘टकाटक २'(taka tak 2)चं संवादलेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रथमेश परब (pratahmesh parab), अजिंक्य राऊत(ajinkya raut), प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. गीतकार जय अत्रे यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे.

हा ही वाचा – ‘समायरा’तील ‘सुंदर ते ध्यान’ गाण्याला आधुनिकतेचा साज

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -