Gauri Khan Birthday:वाढदिवसानिमित्त सुहानाने शाहरुख – गौरीचे शेअर केले रोमँटिक फोटो

गौरी खानच्या वाढदिवसानिमित्त सुहानाने शाहरुख - गौरीचे शेअर केले रोमँटिक फोटो

Suhana shares Shah Rukh - Gauri's romantic photo on Gauri Khan's birthday
Gauri Khan Birthday:वाढदिवसानिमित्त सुहानाने शाहरुख - गौरीचे शेअर केले रोमँटिक फोटो

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी मानली जाते. या दोघांची लव्हस्टोरी तर साऱ्यांनाच माहित आहे. शाहरुखने गौरीला मिळवण्यासाठीचे केलेले प्रयत्न आजही अनेक प्रेमी युगुलांमधील चर्चेचा विषय असतो. सुरुवातीला नकार आणि मग शाहरुखचा गौरीसोबतचा लग्नापर्यंतचा प्रवास अविश्वसनीय आहे. या दोघांचे जुने फोटो आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. गौरी इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिला बॉलिवूडमध्ये शाहरुखची पत्नी म्हणूनच नाही तर एक प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर म्हणून ओळखले जाते. आज गौरी खानचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिची लेक सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईला वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाहरुख-गौरीचा एक जुना रोमँटिक फोटो शेअर केला आहे. गौरीच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्ताने सुहानाने हा खास फोटो पोस्ट केला आहे. रोमँटिक फोटो शेअर करत सुहानाने कॅप्शनमध्ये लिहिले की, आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या फोटोसह सुहानाने हार्टवाली इमोजी शेअर केली आहे. सुहानाच्या या पोस्टवर आता चाहत्यांकडून तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींकडून गौरी खानला शुभेच्छा दिल्या जात आहे.

गौरी ही आज एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. शाहरुखही अनेकदा त्याच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्याच्या यशस्वी करियरमागे पत्नी गौरी खानचे मोठे योगदान आहे.मुळची दिल्लीची असलेली गौरी खान हीने तिचे शिक्षणही दिल्लीतच पूर्ण केले. प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर म्हणून गौरी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आत्तापर्यंत तिने केवळ मन्नतच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घराचे इंटेरिअर डिझाइन केले आहे. गौरीची फॅशन स्टेटमेंट आणि स्टाइल अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवेल अशी असते. तीन मुलांची आई असलेली गौरी खानने स्वत:ला अधिक मेंटेन ठेवलेय.


हे ही वाचा – रिया कपूरने असा सेलिब्रेट केला पती करणच्या वाढदिवस; शेअर केले रोमँटिक फोटो