घरमनोरंजनगुरुद्वाराबाहेर सनी देओल आणि अमिषा पटेलने मारली एकमेकांना मिठी; SGPC ने केला...

गुरुद्वाराबाहेर सनी देओल आणि अमिषा पटेलने मारली एकमेकांना मिठी; SGPC ने केला निषेध

Subscribe

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली होती. अनिल शर्मा यांच्या या चित्रपटाचे यश पाहून यंदा या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘गदर 2’ देखील प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील एका आक्षेपार्ह सीनबद्दल एक नवा वाद सुरु झाला आहे.

काय आहे प्रकरण?

‘गदर 2’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अलीकडेच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने चित्रपचटातील एका दृश्यावर आक्षेप घेतला होता यात अभिनेता सनी देओल आणि दिग्दर्शकांवर कारवाई करण्याची मागणी एसजीपीसीने केली आहे.

- Advertisement -

दिग्दर्शकांनी दिलं स्पष्टीकरण

या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ट्वीटरवर याबाबत खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, मला कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याची अजिबात इच्छा नाही. चंडीगड माझे स्पष्टीकरण सादरीकरण… “सब धर्म सम्भाव, सब धर्म सद्भाव” हा मी शिकलो.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दृश्य गुरुद्वाराच्या बाहेरील भागात शूट करण्यात आले आहे. मी आणि माझे संपूर्ण युनिट प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा आदर करतो. आमचा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, पण यामुळे जर त्यांच्या भावना दुखावल्या असल्यास मी त्यांची माफी मागतो.

- Advertisement -

खरंतर, गदर 2 मधील एका दृश्यामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेते सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असतील तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

तिरुपती मंदिर परिसरात ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने केलं कृती सेननला किस; पुजाऱ्यांनी केला निषेध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -