घरताज्या घडामोडीसुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार

Subscribe

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआय करणार की मुंबई पोलीस यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं. सर्व पुरावे सीबीआयकडे द्यावेत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी आदेशाचं पालन करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयला दिले आहेत. सुशांतचे कुटुंबिय आणि त्यांचे चाहते बरेच दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी करत होते. बिहारमध्ये नोंदविण्यात आलेली एफआयआर सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. तसेच, मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने सांगितले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास न करता फक्त चौकशी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे.

- Advertisement -

अन्यायाविरूद्ध विजय – बिहारचे डीजीपी

सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपविल्याबद्दल बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीवर आणि त्यांच्या अधिकाऱ्याला क्वारंटाइन करणावर सलाल उपस्थित केले आहेत. त्यांनी माध्यमांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सिद्ध झाले की बिहार पोलिसांनी काहीही चूक केली नाही. हा अन्यायाविरूद्ध विजय आहे. आमचा विश्वास आहे की सुशांतला न्याय मिळेल. आमच्यावर अनेक आरोप लावले गेले. आम्हाला चौकशी करण्याची परवानगी नव्हती. पाटना पोलीस कायदेशीररीत्या सर्व काही करत होते. बिहारच्या मुख्यमंत्र्यावर भाष्य करण्याची क्षमता रियाकडे नाही, असं देखील ते म्हणाले.

सीबीआयचे पथक तपासासाठी मुंबईला जाणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयची टीम आता मुंबईला जाणार आहे. आता या प्रकरणाची मुंबईत चौकशी होणार आहे. सीबीआय केस डायरी, सर्व साक्षीदार व संशयितांचे जबाब, मुंबई पोलिसांकडून फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल घेईल. सीबीआय घटनास्थळाला भेट देईल. सुशांतच्या मृत्यूच्या वेळी तेथे हजर असलेल्या लोकांची जबाब सीबीआय नोंदवेल. सीबीआय रिया, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि बाकीच्यांना समन्स पाठवेल. त्यानंतरच सीबीआय कोणाला अटक करायची की नाही त्याचा निर्णय घेईल.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नितीशकुमार यांची प्रतिक्रिया

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहार पोलिसांनी योग्य कारवाई केली हे सिद्ध झाले. बिहार सरकारचा निर्णय कायद्यानुसार घेण्यात आला. आता सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि या प्रकरणाचे सत्य समोर येईल. प्रत्येकाची इच्छा होती की सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. सुशांत प्रकरणाची सीबीआय योग्य चौकशी करेल. संपूर्ण देशाच्या भावना सुशांतशी जोडल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतच्या भावाची प्रतिक्रिया

सुशांतचा चुलत भाऊ नीरजसिंग बबलू म्हणाला, हा निर्णय आमच्या कुटुंबातील आणि देशातील कोट्यावधी लोकांसाठी आला आहे. सीबीआय चौकशीला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आता आम्हाला खात्री आहे की सुशांतसिंग राजपूत याला न्याय मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुशांतच्या वकिलांची प्रतिक्रिया

सुशांतसिंग राजपूत यांचे कौटुंबिक वकील विकास सिंह म्हणाले, सुशांतच्या कुटुंबासाठी हा मोठा विजय आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कोणताही तपास केला नव्हता, असेही न्यायालयाने कबूल केले. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. न्यायाच्या दिशेने ही पहिली आणि मोठी पायरी आहे. आता सीबीआय आपला तपास सुरू करेल आणि सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूचे सत्य कळू शकेल. काल रियाने काढलेले निवेदन फक्त सहानुभूती मिळवण्यासाठीच केले गेले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बहिणीची प्रतिक्रिया

सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी मिळाल्यानंतर अभिनेत्याचे कुटुंबीय खूप आनंदी आहे. सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्ती यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, अखेर सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल. त्याच वेळी अंकिता लोखंडे यांनी लिहिले, सत्य जिंकले. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनीही सीबीआयला चौकशी सोपविल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -