घरताज्या घडामोडीSushant Sing Rajput : NCB ची कारवाई, रिया चक्रवर्ती विरुद्ध FIR दाखल

Sushant Sing Rajput : NCB ची कारवाई, रिया चक्रवर्ती विरुद्ध FIR दाखल

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपुत प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरमी ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCB ने रिया विरूद्ध FIR दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती अडचणीत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि NCB या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे. त्यानंतर रिया विरुद्ध  कलम २०,२२,२७,२९ NDPS ACT नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर रियाचे काही Whatsapp Chat प्रसिध्द झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरणाने वेगळे वळण घेतलं आहे.

काय आहे चॅटमध्ये

हे चॅट रिया आणि गौरव आर्यामधील आहे. गौरव तोच इसम आहे, जो ड्रग डीलर असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

पहिल्या चॅटमध्ये म्हटले आहे की, ‘ आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो  आहोत पण मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे’. हा मेसेज रियाने ८ मार्च २०१७ रोजी गौरवला पाठवला होता.

तर दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवशी बोलली आहे की, यामध्ये रियाने गौरवला विचारले आहे की, ‘ तुझ्याकडे MD आहे का?’. एमडीचा अर्थ MDMA असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे.

तर पुढच्या चॅटमध्ये आहे की, ‘चहा, कॉफी किंवा पाण्यामध्ये ४ थेंब टाक आणि त्याला ते पिऊ दे. परिणाम पाहण्यासाठी ३० ते ४० मिनीट थांब’. दोघांमध्ये हे संभाषण २५ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले होते.

एप्रिल २०२० मधील मिरांडा आणि रियामधील चॅट समोर आले आहे. त्यामध्ये मिरांडाने असे म्हटले आहे की – ‘हाय रिया, स्टॉक जवळपास संपला आहे.’

एप्रिलमध्ये पुन्हा एकदा मिरांडाने रियाला असे विचारले आहे की, ‘काय आपण हे शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो? पण त्याच्याकडे फक्त Hash आणि bud आहे’. यांना लोअर लेव्हलचे ड्रग मानले जाते.


हे ही वाचा – धक्कादायक: कोरोनामुक्त महिलेला पुन्हा कोरोनाची लागण, देशातली पहिली केस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -