घरताज्या घडामोडीसुशांतच्या पाच डायऱ्या पोलिसांच्या हाती, आत्महत्येच गूढ उलगडणार

सुशांतच्या पाच डायऱ्या पोलिसांच्या हाती, आत्महत्येच गूढ उलगडणार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी स्वत:च्या हाताने लिहिलेल्या पाच डायऱ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचे आत्महत्येचे कारण अद्याप पुर्णतः स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याच्या आत्महत्येमुळे अनेक जण तर्कवितर्क लावत आहेत. त्यामुळे पोलीस देखील वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेमागचा शोध घेत आहेत. त्यातच आता पोलिसांना सुशांतच्या राहत्या घरी पाच डायऱ्या हाती लागल्या आहेत. तर या संपूर्ण डायऱ्या सुशांतने स्वत:च्या हाताने लिहिल्या आहेत. त्यामुळे या डायरीमधून गूढ उलघडण्याची शक्यता दिसून येत आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली असून हा नेपोटिज्मचा प्रकार असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे पोलीस देखील त्याच मार्गाने शोध घेत आहेत. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचे म्हणणे आहे की, सुशांत नैराशेत होता याबाबत कोणतीही माहिती नव्हती. तसेच ते कधी जाणवले देखील नाही. तसेच पुढे म्हणाले की सुशांत शांत शांत होता. पण, तो नैराशेत असल्याचे जाणवले नाही.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांनी सुशांतच्या वडिलांना त्यांचा कोणावर संशय आहे का? अशी देखील विचारणा केली. मात्र, त्यावर ते म्हणाले की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच माझा कोणावर संशय देखील नाही. परंतु, सुशांत कोणत्या नैराशेत होता याबाबत पोलीस तपास करीत आहेत. त्याच दरम्यान त्यांना त्याच्या घरात औषध आणि डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन देखील सापडले आहे. यावरुन त्याचे डॉक्टरकडे उपचार सुरु असल्याचा अंदाज आहे.

रिया चक्रवती पोलीस ठाण्यात दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी रिया चक्रवती ही गुरुवारी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तिची त्या दरम्यान चौकशी देखील करण्यात आली. तर बुधवारी पोलिसांनी मुकेश छाबडाची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती. तसेच सुशांतच्या मित्रांची आणि क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पीठानी याची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कुटुंबियांनी गंगा नदीत केले सुशांत सिंह राजपूतचे अस्थी विसर्जन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -