घरमनोरंजननोव्हेंबरमध्ये सुशांत सिंह राजपूत होणार होता विवाहबद्ध!

नोव्हेंबरमध्ये सुशांत सिंह राजपूत होणार होता विवाहबद्ध!

Subscribe

यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुशांत सिंह याचं लग्न करण्याचे होतं नियोजन

बॉलिवूडच नाही तर संपूर्ण देशाला सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमुळे धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुशांत सिंह याचं लग्न करण्याचे नियोजन होते. तसेच अलीकडेच त्याने त्याचे वडील केके सिंग यांच्याशी यासंदर्भात बोलणे देखील केले होते, आणि त्यांनी लग्नासाठी सहमती दर्शविली होती.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या नातेवाईकाने खुलासा केला आहे की, यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुशांत लग्न करणार होता. त्याच्या घरात लग्नाची तयारीही सुरु झाली होती. मात्र तो कोणाशी लग्न करणार आहे. याचा खुलासा त्यांनी केला नाही. परंतु यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचे लग्न होणार हे मात्र नक्की होतं.

- Advertisement -

सहा महिन्यांपासून सुशांत अस्वस्थ

३४ वर्षांचा सुशांत रविवारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत अस्वस्थ असून नैराश्यात होता. यावर तो उपचारही घेत होता.

अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली होती

छोट्या पडद्यावर ‘किस देश में है मेरा दिल’, ‘पवित्र रिश्ता’ या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘काय पो छे’ सुशांतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘राबता’, ‘पिके’, ‘छिछोरे’ या चित्रपटातून त्याने आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आणि बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले होते.


सुशांतने ३ दिवसांपुर्वी वडिलांना केला अखेरचा फोन; ‘या’ विषयी व्यक्त केली होती चिंता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -