घरमनोरंजनसुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल; पाच डॉक्टरांनी केले परिक्षण

सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल; पाच डॉक्टरांनी केले परिक्षण

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आज आला असून गळफास लागल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच डॉक्टरांच्या टीमने या अहवालाचे परिक्षण केले असून या प्रकरणी आणखी एक विसरा रिपोर्ट येणे बाकी आहे. मुंबई पोलिसांनी डीजी फॉरेंसिकला विसरा रिपोर्टसंदर्भात पत्रदेखील पाठवले आहे. सुशांतच्या शरिरावर कोणत्याही जखमा नसून नखसुद्धा लागलेल्या खुणा आढळून आल्या नाहीत. सुशांतच्या आत्महत्येसंबंधी त्या जवळच्या अनेकांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान, आज सुशांतच्या सीएची चौकशी पोलीस करत आहेत. मात्र अद्याप डॉक्टरांचे स्टेटमेंट घेतले गेले नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले असे समोर येत होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरूवात केली. सिनेसृष्टीतील घराणेशाही हा मुद्दा प्रामुख्याने समोर आला असून सुशांतने या कारणामुळेच आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

आत्महत्येच्या दिवशी ज्यूस घेतल्यानंतर त्याने स्वत:ला रुममध्ये कोंडून घेतले आणि नंतर काय झाले की आत्महत्या करुन त्याने स्वत:चे जीवन का संपविले याबाबत समजू शकले नाही. आतापर्यंतच्या चौकशीतून सुशांतच्या आत्महत्येमागे डिप्रेशन हेच मुख्य कारण आहे, असे पोलिसांना वाटत आहे. मात्र बॉलिवूडच्या काही प्रतिष्ठित लोकांकडून त्याला संपविण्याचा विडा उचलला जात असल्याचे काही वृत्त आले आहे, त्यामुळे ही बाजूही पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. या आत्महत्येचा तीन पथकांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा –

रामदेवबाबांविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -