घरमनोरंजनस्वामी समर्थांचे रूप दिसणार मोठ्या पदड्यावर

स्वामी समर्थांचे रूप दिसणार मोठ्या पदड्यावर

Subscribe

‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..’ हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रुप आपल्या नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवी उर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होत असल्यामुळे, स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावरदेखील आपल्याला पाहता येणार आहे. कारण, स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपटाचे नाव ‘श्री स्वामी समर्थ’ असे असेल. खास दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दादरच्या पश्चिमेला असणाऱ्या प्रसिद्ध स्वामी समर्थांच्या मठात दसऱ्याच्या दिवशी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतले कलाकार अंकुश चौधरी, सतीश पुळेकर आणि किशोरी अंबिये यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. पर्व क्रिएशन्स निर्मिती ‘श्री स्वामी समर्थ’ या सिनेमाचे लिखाण आणि दिग्दर्शनाची जबाबदारी समीर सुर्वे यांनीच केले आहे. या चित्रपटातील स्वामी समर्थांच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकतेचे वातावरण आहे. त्यामुळे, स्वामींच्या महत्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडीशन घेतली जाणार असल्याचे कळते. शिवाय या सिनेमात मराठीतील दिग्गज कलाकारांचीदेखील भूमिका असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -